FOREST DEPARTMENT SEIZES TEAK WOOD WORTH ₹60 LAKH IN GADCHIROLI saam tv
महाराष्ट्र

वन विभागाची धडक कारवाई: ५० ते ६० लाखांचा सागवान लाकडाचा साठा जप्त

Teak Wood Smuggling Case In Gadchiroli Etapalli Forest: गडचिरोलीतील एटापल्ली भागात वन विभागाची मोठी कारवाई; सुमारे ५० ते ६० लाखांचा सागवान लाकडाचा साठा जप्त. तस्कर फरार, आंतरराज्यीय रॅकेटचा संशय.

Omkar Sonawane

गणेश शिंगाडे, साम टीव्ही

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मोहुर्ली उपवन क्षेत्रात वन विभागाने सागवान लाकूड तस्करांविरोधात मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५० ते ६० लाख रुपये मूल्याचा सागवान लाकडाचा साठा जप्त करण्यात आला असून, वन विभागाची चाहूल लागताच १५ ते १६ संशयित तस्कर घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी मिळलेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाईची चक्रे फिरवली. या दरम्यान 'एपी-२९ टीए-६९५४' (AP-29 TA-6954) क्रमांकाचा टाटा ट्रक ताब्यात घेण्यात आला. या ट्रकमध्ये धान कोंड्याच्या पोत्यांच्या आड अत्यंत चलाखीने सागवान लाकडाची अवैध वाहतूक केली जात होती. मात्र, जंगलातील अत्यंत चिखलमय आणि निसरड्या रस्त्यामुळे ट्रक चिखलात रुतला आणि तस्करांचा हा डाव पुरता फसला. वन विभागाच्या पथकाने अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर २ ऑगस्ट रोजी अखेर तो ट्रक चिखलातून बाहेर काढला आणि घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला.

प्राथमिक अंदाजानुसार जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ५० ते ६० लाख रुपयांच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाकडाची तस्करी सुरू असल्याने यामागे एखादे मोठे आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी वन विभागाने पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून, फरार झालेल्या संशयित तस्करांचा कसून शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT