ठाणे वनविभाग पथकाने एक मोठी धडक कारवाई केली. व्हेल माशाची २६ कोटी रुपये किंमतीची उलटी विक्रीसाठी आणल्याची खबर खबऱ्याने वनविभागाचे अधिकारी यांना मिळाली होती. खारीची शहानिशा करून वनविभागाच्या पथकाने कोट्यवधींची व्हेल माशाची उलटी वनविभागाने हस्तगत करून तस्कर माफियांना धक्काच दिला.
वनविभागाच्या पथकाला मिळालेल्या खबरी नंतर उप वन संरक्षक गजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कंक, वांड अधिकारी देशमुख, आरएफओ शहापूर, वनपाल रवींद्र तंवर, नारायण माने, गणेश परहर, रामा भांगरे यांच्या पथकाने तपास सुरु केला.
खबरीची गंभीरता अशी की, कोट्यवधींची व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार होती. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने धडक कारवाईसाठी आपले खबऱ्यांचे नेटवर्क पसरविले. अखेर मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने मुंबईच्या मालाड आणि अंधेरी परिसरातून व्हेल माशाची उलटी आणि ती जवळ बाळगून तस्करी करण्यापूर्वीच वनविभागाच्या पथकाने पाच जणांना बेड्या ठोकल्या.
स्पर्म व्हेल या अतिशय दुर्मिळ आणि खोल समुद्रात असलेल्या वेल माशाच्या उलटीचा हा भाग असतो जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी या उलट तिला समुद्रकिनाऱ्यावर येण्यास लागतो विशेष म्हणजे वेल माशाची ही उलटी समुद्राच्या पाण्यात बुडत नसून समुद्रातील असलेल्या क्षार मुळे उलटी समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर तरंगते आणि गोळा होऊन वर्षभराचा प्रवास करून समुद्रकिनाऱ्यावर येते.
भारतापेक्षा विदेशात मोठी मागणी
व्हेल माशाची उलटीला भारतात सोबतच विदेशातही मोठी मागणी आहे. भारतात व्हेल माशाच्या उलटीसाठी एक किलोसाठी १ कोटी रुपये भाव आहे. तर परदेशात एका किलोसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत प्रति किलो ३ ते ४ कोटी एवढी आहे. व्हेल माशाच्या उलटीचा मोठा उपयोग होतो. त्यामुळेच या उलटीला मोठी किंमत प्राप्त झाल्याची माहिती वनविभागाचे उप वन संरक्षक गजेंद्र हिरे यांनी दिली.
अतिउच्च प्रतीच्या सुगंधी द्रव्यासाठी होतो उपयोग
व्हेल माशाच्या उलटीचा वापर हा भारतात आणि विदेशात अतिउच्च प्रगतीच्या सुगंधी द्रव्य, परफ्युम बनविण्यासाठी होतो. सुगंधी अगरबत्तीतही या व्हेल माशाच्या उलटीचा वापर होतो. तर उलटीमुळे परफ्युमचा सुगंध हा खूप काळ टिकतो. व्हेल माशाच्या एक किलो उलटीमध्ये तब्बल दहा हजार लिटर महागडे अत्तर परफ्युम, रोजच्या वापरातील सेंट तयार करण्यात येते. तर या उलटीतून बाजारात एक किलोमध्ये हजारो कोटीची उलाढाल होते. त्यामुळे उलटीला मोठी किंमत आहे.
उलटी किंवा व्हेल माशाचा भाग बाळगणे शिक्षेस पात्र
हजारो कोटींची उलाढाल बाजारात करणाऱ्या व्हेल माशाच्या उलटी किंवा व्हेल माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणे हे वन कायद्यानुसार गुन्हा असून तो शिक्षेस पात्र आहे. सादर प्रकरणी जामीनपात्र गुन्हा दाखल करून दोषी आढळल्यास किमान तीनवर्ष आणि कमाल ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा या कायद्यांतर्गत तरतूद असल्याची माहितीही उप वन संरक्षक गजेंद्र हिरे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.