Adulterated substances In Nagpur संजय डाफ
महाराष्ट्र

Nagpur News: नागपूरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ७४.९५ लाखांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Latest News: नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ आढळले आहेत. अन्न औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मसाले, सुपारी आणि चहापत्ती यांसारख्या पदार्थांमध्येही भेसळ आढळल्याने खळबळ माजली आहे. भेसळयुक्त पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. (Nagpur Crime News)

नागपूर जिल्ह्यातून मसाले, सुपारी, चहापत्ती यांसारख्या पदार्थांमध्ये भेसळ आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने विविध ठिकाणी कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (Food And Drug Administration) कारवाईत ७४.९५ लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

विनापरवाना आणि भेसळीच्या संशयावरुन अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत. १ नोव्हेंबरपासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाची ही मोहिम सुरु आहे. भेसळयुक्त पदार्थ सापडल्याने अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत अनेक विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : झालं 'कल्याण'! निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजप-शिवसेनेत तणाव, अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा

Overcome Laziness: शरीरातील आळस दूर करण्यासाठी 'या' सोप्या टिप्स करा फॅालो

Belapur Crime : पोलीस पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल; बचत गटाच्या नावाने पैसे घेत केली फसवणूक

अंतराळात दिसली रहस्यमयी वस्तू; शास्त्रज्ञंही झाले हैराण

Marathi News Live Updates : अजित पवारांचे कट्टर समर्थक मोहोळचे माजी आमदार राजन पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT