Solapur news  Saam tv
महाराष्ट्र

Solapur : कुस्ती क्षेत्राला हादरा; अन्न व औषध विभागाच्या कारवाईने खळबळजनक बाब उघड

कुस्ती जगताला हादरा देणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून समोर आली आहे

भारत नागणे

Solapur News : सोलापूरमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कुस्ती जगताला हादरा देणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून समोर आली आहे. पैलवानांकडून कुस्ती जिंकण्यासाठी कृत्रिम शक्ती वर्धक मेफेन टरमाईन हे औषध अवैधपणे विकत घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

अन्न व औषध विभागाने या प्रकरणी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे कृत्रिम शक्ती वर्धक मेफेन टरमाईन विक्री करणाऱ्या तीन औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यापुर्वी अकलूज परिसरात ही कारवाई करण्यात आल्याने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित औषध विक्रेत्यांनी या शक्ती वर्धक मेफेन टरमाईन‌ची अवैधपणे पैलवानांना विकल्याचं समोर आले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर असताना झालेली ही कारवाई कुस्तीतील डोपिंगची कीड लागली की काय असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

मेफेन टरमाईन हे जास्तीत जास्त 300 रूपयांना डॅाक्टर विकत घेतात. या इंजेक्शनची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि बिलाशिवाय विक्री करता येत नाही. सध्या काळ्या बाजारात हे इंजेक्शन दीड हजार रूपयांना सहज विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कुस्तीतील स्पर्धकांना डोपिंगची कीड ?

कुस्ती स्पर्धेला डोपिंगची कीड लागली का असा प्रश्न निर्माण झाला आहे. डोपिंग म्हणजे खेळाडू स्पर्धा जिंकण्यासाठी मादक द्रव्य, उत्तेजक पदार्थाचे सेवन करतात. त्यामुळे स्पर्धेत कोणी डोपिंग केल आहे का, त्यासाठी काही स्पर्धेत डोपिंग देखील केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसने घेतला पेट

Chhatrapati Sambhaji Maharaj: संभाजी महाराजांवरील 'राजसंन्यास' नाटकाला शासकीय संन्यास, गडकरी खंडातून वगळलं

Sanjay Raut: शहीदांच्या कुटुंबियांच्या जखमा ताज्या असताना सामना खेळणं हा बेशरमपणा, संजय राऊत संतापले|VIDEO

Girl Stuck In Classroom: शाळेमध्ये वर्गात मुलगी अडकली, बाहेरून लॉक, खिडकीतून आरडाओरड करताना घडलं भयंकर

Kondhwa News : अल्पवयीन टोळक्याचा भयंकर कृत्य, वादाचा राग पार्क केल्या गाड्यांवर काढला, पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT