flights from nanded to pune and nagpur will start from 27 june 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Nanded News : नांदेडहून आता पुणे, नागपूरला विमानसेवा, जाणून घ्या शुल्क

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद आणि अहमदाबाद नंतर आता नांदेड येथून पुणे आणि नागपूरला विमानसेवा सुरू होणार आहे. येत्या 27 जून पासून नांदेड येथून विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा स्टार एअर कंपनीने केली आहे. या दोन्ही शहरांना जाण्यासाठी प्रवाशांना 3 हजार 500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत.

नांदेड हे देशाच्या विविध भागांना विमानसेवेने जोडले गेले आहे. एक जूनपासून नांदेड ते हैदराबाद ते तिरुपती अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. काही वर्षे नांदेड विमानतळ तांत्रिक कारणामुळे बंद होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि गुरुद्वारा बोर्ड यांनी पाठपुरावा केल्याने नांदेड येथुन विमानसेवा पुन्हा सुरू झाली.

सध्या नांदेडहून बंगळुरु नांदेड गाझियाबाद दिल्ली आणि नांदेड अहमदाबाद अशी दोन्ही बाजूंनी विमानसेवा सुरू आहे. या ठिकाणी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. एक जून पासून नांदेड हैदराबाद तिरुपती अशी विमानसेवा सुरू केलीय. आता 27 जून पासून नांदेड पुणे आणि नागपूर अशी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय स्टार एअर कंपनीने घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT