Vertical Sat-Bara  Saam Tv News
महाराष्ट्र

सोसायटीतील फ्लॅटचाही आता सातबारा, फ्लॅट मालकांसाठी खूशखबर, फ्लॅटसाठी आता 'व्हर्टिकल सातबारा’?

Vertical Sat-Bara : राज्यातील फ्लॅटधारकांना इमारतींच्या मजल्याचा सातबारा मिळवता येणार. मात्र हा सातबारा नेमका कसा मिळणार? प्रत्येक मजल्यासाठीचा व्हर्टिकल सातबारा म्हणजे काय? महसूल विभागची योजना काय आहे?

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

मुंबई : राज्यातील फ्लॅटधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लॅटधारकांना त्यांच्या घराची थेट मालकी मिळवून देण्यासाठी महसूल विभागानं महत्त्वाचं पाऊल उचलयं. ‘व्हर्टिकल सातबारा’ या योजनेद्वारे सरकार आता जमिनीच्या मालकीचा 7/12 उतारा थेट इमारतीच्या मजल्यांसाठी देण्याचा विचार करतय. अशा योजनेचा फायदा संयुक्त कुटुंबांच्या इमारतींमधील रहिवाशांना होणार आहे. कारण एकाच घरातील मुलं लग्नानंतर दोन ते तीन मजली घरे बांधतात. तेव्हा पुढच्या पिढ्यांमध्ये मालमत्तेच्या मालकीवरून किंवा वाटणीवरून कायदेशीर वाद होत असतो. मात्र व्हर्टिकल सातबारामुळे थेट इमारतींच्या मजल्याचा सातबारा मिळवता येणार आहे. त्यामुळे ‘व्हर्टिकल सातबारा’ काय आहे पाहूयात...

काय आहे ‘व्हर्टिकल सातबारा’?

इमारतीत राहणाऱ्यांना सातबारा उतारा मिळत नाही

‘व्हर्टिकल सातबारा’मुळे मालकाला फ्लॅटचा स्वतंत्र सातबारा मिळणार

घराची खरेदी-विक्री, बँक कर्ज व्यवहार, वारसाहक्क सोपं आणि पारदर्शक होणार

फ्लॅटधारकांना जागेचा थेट मालकी हक्क सिद्ध करणं सोपं होणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘व्हर्टिकल सातबारा’ योजनेचा प्रस्ताव तयार केलाय. अंतिम मसुद्यावर सध्या विचारविनिमय सुरू आहे. ‘व्हर्टिकल सातबारा’ हा महाराष्ट्रातील मालमत्ता हक्क व्यवस्थेतील ऐतिहासिक बदल ठरणार आहे. ही योजना कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीय. ज्या निवासी अपार्टमेंट्सना आधीच विक्री करारासारखी मालकी दस्तऐवज उपलब्ध आहेत, त्यांच्यासाठी ही योजना लागू होईल की नाही, याबाबत सध्या तरी स्पष्टता नाही.मात्र येत्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Tourism: गुलाबी थंडीत फिरायला जायचा प्लान करताय? लांब नको सांगलीतील 'या' ठिकाणी मज्जा घेऊन याच

उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल|VIDEO

प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर लीक? बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसनं पोस्ट शेअर करून दिली माहिती

Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहाचा हटके लूक; PHOTO पाहा

Vitamin deficiency: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत जांभई येते?

SCROLL FOR NEXT