Jalana Crime News Saam Tv
महाराष्ट्र

संतापजनक! मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीतून एक संतापजनक बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

जालना: जालना (Jalana) जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीतून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या महिलेच्या अपंगत्वाचा फायदा घेत महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, दाभाडी या गावात एक मानसिकदृट् अपंग असलेल्या महिलेवर पाच जणांनी सामुहिक अत्याचार केला. यात गावातील सुंदर कोल्हे, दत्तू खमाटे, बाबासाहेब कोल्हे, लक्ष्मण सोरमारे, संदीप कोल्हे या पाच जणांनी मिळवून गावातील एका मानसिक दृष्ट्या अपंग असलेल्या महिलेच्या असाहाय्यतेचा फायदा घेत महिलेवर 28 ऑगस्ट रोजी घरात कुणी नसताना बलात्कार केल्याची घटना घडली.

या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून 8 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा बदनापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी रात्री तत्काळ गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली. तर दोन आरोपी फरार आहेत.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध कलम .376 ( 2) , ( ।) , 376 (D) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अधिक जलद गतीने होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन आरोपी अजुनही फरार असल्याने त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी शिकण्याची अंतिम मुदत संपली; 7750 रिक्षावाल्यांचं लायसन्स जाणार?

पुण्यात रिलस्टार की गँगस्टर? रिलस्टार माधवी कुंभारसह 7 जणांना अटक

जंतर-मंतरनंतर विद्यार्थ्यांचा दुसरा मोठा विजय! CGL आणि TDPL द्वारे घेतलेल्या सर्व परीक्षा रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा

जनगणनेत मराठी माणूस द्विभाषिक होणार? मराठी भाषेच्या निधीला कात्री लागणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT