accident near hotel kandil in amravati saam tv
महाराष्ट्र

लग्नाच्या बाेलणीसाठी निघालेल्या पोकळे परिवारावर काळाचा घाला; ५ ठार, ५ जखमी

या अपघाताची माहिती मिळताच पाेलिस तातडीने घटनास्थळी पाेहचले.

अरुण जोशी

अमरावती : शहरातील रहाटगाव रिंगरोडवर ट्रक व तवेरा वाहनांच्यात झालेल्या अपघातात चार जण जागेवरच तसेच एक जण रुग्णालयात ठार झाला आहे. या अपघातामधील ट्रक (truck) अमरावतीहून (amravati) नागपूरकडे (nagpur) जात होता तर तवेरा (एमएच २६ एए ७९९९) अमरावतीहून वलगावकडे निघाली होती. ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नांत हा भीषण अपघात (accident) झाल्याची माहिती पाेलिसांनी (amravati police) दिली. दरम्यान ठार झालेल्यांपैकी काही जण अंजनगाव बारी (Anjangaon Bari) येथील रहिवासी आहेत. (amravati latest marathi news)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अंजनगाव बारी येथील पोकळे परिवार हे तवेरातून वलगाव येथे मुलाच्या लग्नाच्या बाेलणीसाठी जात हाेते. या अपघातात तवेरा वाहनाचा चालक रमेश आखरे, रोशन आखरे व पोकळे परिवारातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. या जखमींवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT