Buldhana Swine flu News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News : बुलडाण्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव; इकबाल चौकातील युवक पॉझिटिव्ह

शहरातील इकबाल चौकातील एक युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टिव्ही

बुलडाणा : राज्यात स्वाईन फ्लूचा (Swine flu) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य प्रशासन करीत आहे. अशातच बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातही स्वाईन फ्लूची एन्ट्री झाली आहे. बुलडाण्यात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. शहरातील इकबाल चौकातील एक युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. (Buldhana Latest News)

विशेष बाब म्हणजे पहिला कोरोना संसर्गीत रुग्ण देखील बुलडाणा शहरात मिळाला होता. आता स्वाईन फ्लू ग्रस्त सुद्धा शहरातील आहे. बुलडाणा शहरातील इकबाल चौकात राहणाऱ्या एका युवकाला (32 वर्षीय) स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.

मागील 4 दिवसांपासून हा युवक येथील जिल्हा महिला रुग्णालयात भरती आहे. त्याचे लक्षणें पाहता दोन वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र, ही टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याचा तपासणी अहवाल पुणे एन आय व्ही ला पाठविण्यात आला. (Buldhana Swine flu News)

दरम्यान, काल रात्री पुण्यावरून त्याचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालात सदरील युवकाला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. सदरील युवक हा सुरूवातीला व्हेंटिलेटर्वर होता. पण आता तो स्थिर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी कळविले आहे.

स्वाईन फ्लू हा कोरोनापेक्षाही अधिक गतीने संसर्ग होणारा आजार आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांची टेस्ट केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच भारतीय खेळाडूची निवृत्ती, १७ वर्षाच्या करिअरचा शेवट

Maharashtra Live News Update : - नुकसानग्रस्त कुटुंबीयांसमवेत अंबादास दानवेंनी साजरी केली दिवाळी

Sangli Water Supply : ऐन दिवाळीत सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट; संतप्त नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर धरणे

Rohit Pawar : दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

SCROLL FOR NEXT