जालना Saam TV
महाराष्ट्र

बंदी उठल्यानंतर जालना जिल्ह्यात पहिली बैलगाडी शर्यत सुरु

आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्या नंतर आज पासून या शर्यतीस सुरवात झाली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : बैलगाडी शर्यतीवर बंदी उठल्या नंतर आज जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडी या ठिकाणी शंकर पोटाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये मोठ्या प्रमाणात पंचकृषितील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या उत्सात सहभाग नोंदविला होता. भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते या शंकर पोटाचे उदघाटन करण्यात आले. बैलगाडी शर्यतीच्या (Bullock Cart Race) बंदी नंतर गेल्या अनेक दिवसांपासून या शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हा पासून ही शर्यत बंद होती. आयोजकांनी बंदी उठल्या नंतर या शर्यतीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळावी अर्ज ही केला होता, या शर्यतीचा जीआर आल्यानंतर शर्यतीसाठी परवानगी देण्यात आल्या नंतर आज पासून या शर्यतीस सुरवात करण्यात आली आहे.

आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्या नंतर आज पासून या शर्यतीस सुरवात झाली आहे, ही शर्यत पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. या शर्यतीत जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शर्यतकर्त्यांनी सहभाग नोंदवला आहे. दोन दिवस चालणाऱ्या शर्यतीमुळे परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत दाखल

World Physiotherapy Day : बाळंतपणानंतर पाठदुखी, कमजोरी आणि डिप्रेशनमुळे त्रस्त आहात? मग फिजिओथेरपी ठरेल सगळ्यात बेस्ट ऑपशन

बुलेट ट्रेनचं काम सुसाट! मुंबईतील महत्वाचा टप्पा पार केला, पाहा VIDEO

Mira Bhayndar : एकाच कुटुंबातील ६ जणांना विषबाधा; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT