Beed News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Hotel Firing News : सिगारेटचं पाकीट महाग दिलं म्हणून थेट ३ गोळ्या झाडल्या; बीडमधील थरकाप उडवणारी घटना

Crime News : परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद जिरे

Beed News : चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले? असं म्हणत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळी जवळील कन्हेरवाडी शिवारात घडली आहे. तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस  (Police)  ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी शहरापासून जवळच कन्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे. जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात. या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास 4 जण चहा पिण्यासाठी आले. त्यांनी हॉटेलमधील वेटरकडे सिगारेटचे पाकीट मागितले. (Maharashtra News)

वेटरने सिगारेटचे पाकीट आणले मात्र सिगारेटचे पाकीट महाग का दिले? असं म्हणत ग्राहकांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. बाचाबाची आणि वादावादी एवढी वाढली की प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. (Latest Marathi News)

ग्राहकांपैकी एकाने स्वतःकडील पिस्तूलातून हवेत एक राउंड फायर केला. गोळीबाराचा आवाज ऐकून नोकरांनी हॉटेलचे शटर लावून घेतले. त्यामुळे संतापलेल्या या लोकांनी शटरवर दोन राउंड फायर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT