fire broke in clothing shop at yeola near nashik  saam tv
महाराष्ट्र

येवलामध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, लाखाेंचे नुकसान; भंडारा शहरात सिलेंडरच्या स्फाेटात घर जळून खाक

Siddharth Latkar

- अजय सोनवणे / शुभम देशमुख

Fire News :

नाशिक जिल्ह्यातील येवला (yeola) शहरातील मेनरोड वरील पारख क्लॉथ या कपड्याच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास शार्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेत लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे भंडारा (bhandara) शहरात गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने एक घर जळून खाक झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येवला येथे पारख क्लॉथला आग लागल्यानंतर त्याच दुकानात झोपलेल्या तीन कर्मचा-यांनी आरडा-ओरडा सुरु केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दुकानाकडे धाव घेत मदत कार्य सुरु केले. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु कपड्यामुळे आग भडकली. मनमाड, कोपरगाव येथून फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या. सुमारे तीन तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले. या आगीत लाखो रुपयाच नुकसान झाले आहे.

सिल्लीमध्ये सिलेंडरच्या स्फाेटात घर जळून खाक

भंडारा शहरा लगत असलेल्या सिल्ली येथे सिलेंडरचा स्फाेट झाल्याने संपुर्ण घर जळून खाक झाले. लक्ष्मी फंदे या सकाळी स्वयंपाक करीत हाेत्या. गॅसवर भाजी ठेऊन दूसरीकडे काम करत असताना अचानक गॅसने पेट घेतला व सिलेंडरने आग पकडली. (Maharashtra News)

त्यामुळे सिलेंडरचा स्फाेट झाला. सुदैवाने लक्ष्मी या घराबाहेर हाेत्या. त्यामुळे ते बचावल्या. या घटनेत घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT