Jalna News Saam
महाराष्ट्र

Jalna News: दिवसाढवळ्या ५-६ जण घरात घुसले, तुटून पडले; बापलेकाचा जीव घेतला, जालन्यात खळबळ

Father-Son Duo Killed in Jalna: जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात भरदिवसा राहत्या घरात बाप-लेकाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Bhagyashree Kamble

भरदिवसा राहत्या घरात बाप लेकाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना जालनातील बदनापूर शहरात घडली आहे. पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.

बदनापूर शहरातील शंकर नगर भागात मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. अशोक ढगे (वडील) तर, यश ढगे (मुलगा) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पैशांचा वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने दोघांची हत्या त्यांच्याच राहत्या घरात केली असून, वार करून आरोपी फरार झाले आहेत.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी गाठत पंचनामा केला. पोलिसांच्या तपासात पाच ते सहा जणांनी मिळून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून, इतर आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या घटनेने संपूर्ण बदनापूर शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर ढगे कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : “तुझा रेट काय?” बस स्टॉपजवळ उभ्या असलेल्या मुलीशी असभ्य वर्तन, शिवसैनिकांनी दिला चोप; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री शपथग्रहण सोहळ्यात पोहचले, थोड्याचवेळात घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

अमेरिकेनं दिले एलियन्सचे पुरावे, पेंटागॉनचा धक्कादायक अहवाल

Matkichi Usal Recipe: 'मदर्स डे' निमित्त नाश्त्याला बनवा झणझणीत मटकीची उसळ, सर्वजण पोट भरेपर्यत खातील

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो..₹१५०० बंद झाले का? योजनेत तुमचं नाव आहे का? एका क्लिकवर असं तपासा स्टेट्स

SCROLL FOR NEXT