महाराष्ट्र

Ahmednagar News: शिव्या द्याल तर 500 रुपये दंड; अहिल्यानगर जिल्ह्यात सौंदाळा ग्रामपंचायतचा निर्णय

Ahmednagar News: महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात नवा नियम लागू होणार आहे. शिव्या देणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार आहे.

Dhanshri Shintre

शिव्या.. हे अनेकदा भांडण होण्याचं मूळ कारण असतं. मात्र आता या शिव्या देणाऱ्यांवरच दंडात्मक कारवाईचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतने घेण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने हा निर्णय घेतला असून या निर्णयाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते. आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्याचा ठराव यावेळी ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या ठरावानुसार जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी गावामध्ये यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर पाचशे 500 दंड सक्तीने आकारण्यात येईल. शिव्या देताना आईचा आणि बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अवयवासंदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो.

त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यासाठी बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान केला असल्याचं सरपंचांनी स्पष्ट केलं आहे. माझ्या पंधरा वर्षाच्या कालावधीत या निर्णयासह अनेक धोरणात्मक ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद अरगडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT