गणेश गायकवाड  Saam Tv
महाराष्ट्र

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल

जागा बळकावल्या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस गणेश गायकवाड यांच्या विरुद्ध पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोपाल मोटघरे

पुणे: जागा बळकावल्या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस गणेश गायकवाड यांच्या विरुद्ध पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलिस स्टेशनमध्ये गणेश गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांच्या हस्ते गणेश गायकवडचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता. मात्र पिंपळे निलख येथील जमीन मालक अजिंक्य काळभोर यांची जमीन बळकावने, गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणे अशा स्वरूपाचा गुन्हा गणेश नानासाहेब गायकवाड, त्याचे वडील नानासाहेब शंकर गायकवाड, गणेश साठे आणि त्याच्या दोन-तीन इतर साथीदारा विरोधात दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिस स्टेशन मध्ये देखिल गणेश गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिक विजय वसंत कुलकर्णी यांच्या ट्रीनीटी रिऍलिटी फर्मची ६० गुंठे जागेत बेकायदेशीर रित्या पत्र्याचे आणि तारेचे कुंपण करून जागा बळकावल्या प्रकरणी गणेश गायकवाड विरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आल आहे. गुन्हा दाखल होताच गणेश गायकवाड फरार झाला आहे. हिंजवडी पोलिस आणि सांगवी पोलिस गणेश गायकवाड याला अटक करण्यासाठी शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT