चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस-भाजपमध्ये राडा  संजय तुमराम
महाराष्ट्र

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस-भाजपमध्ये राडा !

द्रपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये जोरदार बाचाबाची अन शिवीगाळ झाली. या प्रकारामुळे ही सभा गुंडाळावी लागली.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये जोरदार बाचाबाची अन शिवीगाळ झाली. या प्रकारामुळे ही सभा गुंडाळावी लागली. सभेची सुरुवात होताच मनसे सदस्य सचिन भोयर यांनी रस्त्याची समस्या मांडण्यासाठी अंगावर चिखल घेत सभागृहात प्रवेश केला. पाठोपाठ काँग्रेस सदस्य आले.

लेखापरीक्षण अहवालातील 200 कोटींचा अपहार, वीज केंद्रातील दोन संचांचा मालमत्ता कर न घेणे आणि डॉ.मंगेश गुलवाडे यांनी कोविड हॉस्पीटलच्या नावाखाली केलेली रुग्णांची लूट, हे विषय घेऊन काँग्रेस सदस्य महापौरांच्या समोर आले. हातात निषेधाचा फलक झळकावत हे सदस्य घोषणाबाजी करीत असतानाच महापौर राखी कंचरलावार यांनी या सदस्यांवर नेमप्लेट भिरकावली.

हे देखील पहा -

त्यानंतर शाब्दिक युद्ध सुरू झाल्यावर स्थायी समिती सभापती रवी आसवानी हे खाली उतरले आणि काँग्रेस नगरसेवक नंदू नगरकर यांच्याशी भिडले. दोघात धक्काबुक्की झाली. प्रकरण तापत असल्याचं लक्षात येताच आयुक्त राजेश मोहिते आणि उपस्थित सदस्यांनी दोघांना वेगळं केलं. यावेळी शिवीगाळ झाल्याचंही चित्रीकरणात ऐकायला येत आहे. शेवटी या गोंधळातच सभा तहकूब करण्यात आली. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी करीत असून, प्रश्नही मांडू दिले जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

दरम्यान आज घडलेल्या प्रकारासाठी विरोधकांची कृती कारणीभूत असल्याचा प्रतिहल्ला महापौरांनी केला. काँग्रेस सदस्याने महापौरांचा टेबल ठोकला, हे कृत्य महापौर आणि सभागृहाचा अवमान करणारे असून त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांना दिल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT