Fire, Solapur saam tv
महाराष्ट्र

Solapur Fire : सोलापूरात दाेन कपड्यांचे कारखाने जळून खाक, पाच दुकानांना झळ (पाहा व्हिडिओ)

नागरिकांनी परिसरात आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली.

विश्वभूषण लिमये

Solapur Fire News : सोलापूरात (solapur) भीषण आगीची घटना घडली आहे. दाेन रेडिमेड कपड्यांच्या कारखान्यांना आगीची झळ बसली आहे. या भीषण आगीत दोन्ही कारखाने जळून खाक झालेत. सोलापूर शहरातील दत्तनगर येथील शिवमहेश्वरी मंदिराजवळील कारखान्यांत ही भीषण आग (fire) लागली हाेती. (Breaking Marathi News)

कारखाने जळून खाक

प्राथमिक माहितीनुसार, गड्डाम आणि कुरापटी या दोन कपड्यांच्या कारखान्यांना आगीची झळ बसली. आज सकाळी एका कारखान्याला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले आणि शेजारील कारखानाही जळून खाक झाला. या आगीत पाच दुकानांचे (shop) नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.

जीवितहानी नाही

आगीची माहिती मिळताच सोलापूर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका कारखान्यात आग लागल्यानंतर आग दुसऱ्या कारखान्यात पसरली. नागरिकांनी परिसरात आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली हाेती. अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळ्यामागे तब्बल इतके वाढले, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT