Fertilizer (File Photo) Saam tv
महाराष्ट्र

Fertilizer Price Update : शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढणार? खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

Farmer News Update : मार्केटमधील किमतींप्रमाणे रशियाने खतांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रविण वाकचौरे

Farmer News :

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आधीच संकटात आहे. पावसाअभावी पिकं करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. कांदा, टोमॅटो यासारख्या पिकांना भाव मिळत नसल्याने रस्त्यावर माल फेकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.

आधीच अनेक अडचणींनी घेरलेल्या शेतकऱ्यांना आणखी एका अडचणीचा सामना करावा लागू शकतो. येत्या काळात खतांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण रशियातील कंपन्यांनी डायअमोनियम फॉस्फेटसारखी (DAP) खते भारताला सवलतीच्या दरात देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणार भारतातील खतांच्या किमतीवर होऊ शकतो. (Latest Marathi News)

मार्केटमधील किमतींप्रमाणे रशियाने खतांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतात खतांच्या किमती वाढू शकतात. याशिवाय चीनने देखील खतांची निर्यात कमी केली आहे.

मागील काही काळात रशियातून भारतात मोठ्या प्रमाणात खतांची आयात झाली होती. मात्र यापुढे सवलतीच्या दरात खत मिळणार नसल्याने भारताला खत खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना देखील वाढीव किमतीत खत खरेदी करावे लागू शकते. सरकार यामध्ये शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीच्या डफळापूर-सांगली रोडवर भीषण अपघात

पुण्यात रक्तरंजित थरार; आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर नवऱ्याकडून बायकोवर धारदार शस्त्राने वार

Kangana Ranaut: रोमान्स केला असता तर आम्हाला मुलं झाली असती, चिराग पासवानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली कंगणा रणौत

काँग्रेसचे टेन्शन वाढलं, आमदार नितीन राऊत नाराज; थेट दिला पक्ष सोडण्याचा इशारा

उष्ण लाटेनं महाराष्ट्राची होरपळ; 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल, कारवाईचाही इशारा

SCROLL FOR NEXT