Solapur District Special Court SaamT
महाराष्ट्र

सोलापूर: पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या बापासह आईला फाशीची शिक्षा

3 जानेवारी रोजी सोळा महिन्याच्या चिमुरडीवर वडीलाने राहत्या घरात अनैसर्गीक लैंगिक अत्याचार केला होता.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधन बापाला आणि तिच्या आईला सोलापूर जिल्हा (Solapur District) विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सिकंदाराबाद येथे कामगार असणाऱ्या पित्याने आपल्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केला होता. एवढ्यावरच न थांबता या नराधम बापाने मुलीला अल्कोहोल पाजून तिचा गळा आवळून खून केला होता. (Solapur District Special Court)

काय आहे हे माणुसकीला काळीमा फासणार प्रकरण -

3 जानेवारी रोजी सोळा महिन्याच्या चिमुरडीवर वडीलाने राहत्या घरात अनैसर्गीक लैंगिक अत्याचार केला होता. शिवाय, पुरावे नष्ट करण्यासाठी मुलीची गळा दाबून हत्या केली. सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस रेल्वेतून जात असताना संशयास्पद हालचालीवरुन प्रवशांना संशय आल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांना (Police) माहिती दिली होती.

हे देखील पाहा -

त्यानंतर सोळा महिन्याच्या मुलीचं मृतदेह घेऊन जात असताना, सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी संशयीत आरोपी आणि त्यासोबत त्याच्या पत्नीला अटक केली आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आज सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयाने पाच महिन्यात या नराधम बापाला आणि आईला फाशीची शिक्षा सुनावल्यावची माहिती सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT