Sangli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime News: बापानेच केला मुलाचा खून, मृतदेहाचे तुकडे करुन तलावाजवळ फेकले; धक्कादायक कारण आलं समोर

Father Killed His Son In Sangli: दारु पिऊन मुलगा त्रास देत असल्याने बापाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

Priya More

Sangli News: बापाने आपल्या मुलाची हत्या (Father Killed His Son) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुऱ्हाडीने मुलाची हत्या करुन नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. मुलाच्या शरीराचे हे तुकडे तलावाजवळ फेकून देण्यात आले. दारु पिऊन मुलगा त्रास देत असल्याने बापाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मुलाच्या हत्येनंतर आरोपी बाप पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने सांगली जिल्हा हादरला. सांगली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मिरज शहरातील सुभाष नगरमधील शिंदे हॉलजवळ राहणाऱ्या बापाने आपल्या मुलाची हत्या केली. रोहित राजेंद्र हांडीफोड (30 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर राजेंद्र यल्लाप्पा हंडिफोड (50 वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. राजेंद्रने आपल्या व्यसनाधीन मुलाची हत्या करुन कायमचाच काटा काढला.

रोहित दारु पिऊन कुटुंबीयांना सतत त्रास देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या राजेंद्रने आपला मुलगा रोहितची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. त्यानंतर राजेंद्रने रोहितच्या शरीराचे कटरच्या सहाय्याने तुकडे केले. त्यानंतर रोहितच्या शरीराचे तुकडे पोत्यामध्ये भरून वेगवगेळ्या ठिकाणी टाकण्यात आले. काही तुकडे गणेश तलावाजवळ टाकून देण्यात आले तर काही तुकडे शिंदे हॉल परिसरात आणून टाकण्यात आले.

मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी राजेंद्रने मिरज शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांसमोर आरोपीने मुलाच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांची पळापळ झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव रोहितचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे मिरज शहरामध्ये एकच खळबळ उडाली. रोहितला दारु पिण्याची सवयी होती आणि तो जुगाराचा व्यसनाधीन होता. व्यसनासाठी रोहित हा कुटुंबाला त्रास देत होता. रोहितच्या या सततच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी त्याची हत्या केली. मुलाची हत्या करुनही कसल्या प्रकारचा पश्चाताप नाही. या घटनेचा तपास सांगली पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT