Hingoli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News: विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याने वडिलांचीच हत्या, सहा महिन्यांनंतर आरोपी मुलाला अटक!

Latest Crime News: या तपासात आरोपी मुलगा पोलिसांची दिशाभूल करत होता. पण शेवटी पोलिसांनी खाकी वर्दी दाखवल्यानंतर आरोपीने गुन्हा कबुल केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप नागरे, हिंगोली

Hingoli News: विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्यामुळे मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा उलगडा करण्यात हिंगोली पोलिसांना (Hingoli Police) यश आले आहे.

या तपासात आरोपी मुलगा पोलिसांची दिशाभूल करत होता. पण शेवटी पोलिसांनी खाकी वर्दी दाखवल्यानंतर आरोपीने गुन्हा कबुल केला. अखेर सहा महिन्यांनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुलगाच बापाचा खुनी निघाल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या (Hingoli News) कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या (Balapur Police Station) हद्दीत ही घटना घडली आहे. 28 डिसेंबर 2022 रोजी रामेश्वर ते एकदरी परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर हा मृतदेह आप्पाराव राठोड यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आप्पाराव राठोड यांचा मुलगा विठ्ठल राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.

आप्पाराव राठोड यांच्या मुलाने पोलिसांना चुकीची माहिती देत आपल्या सासरकडील मंडळींनी वडिलांचा खून केला असल्याचे सांगितले. बाळापूर पोलिसांच्या तपासात त्याच्या सासरकडील मंडळींनी खून केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाही. त्यामुळे फिर्यादी असलेला आप्पाराव राठोड यांचा मुलगा विठ्ठल हा चुकीची माहिती देत आपली दिशाभूल करत असल्याचा संशय पोलिसांना आला.

या प्रकरणात सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर देणाऱ्या विठ्ठल राठोडला पोलिसांनी खाकी वर्दी दाखवली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने वडिलांचा खून आपणच केला असल्याची कबुली दिली. विठ्ठलचे विवाहबाह्य संबंध होते. त्या महिलेसोबत त्याला लग्न कराचे होते. पण त्याचे वडील त्याच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध करत होते. त्यामुळेच त्याने वडिलांचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगा विठ्ठलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT