Crime news
Crime news Saam Tv
महाराष्ट्र

नात्याला काळीमा! मुल होत नसल्याने सासऱ्याकडून सुनेचा आंघोळ करताना व्हिडीओ, शारिरिक संबंधासाठी दबाव

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर शहरामध्ये सासरा आणि सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. सुनेला आपल्या मुलापासून मुल होत नसल्याने तिचा आंघोळ करताना व्हिडीओ शूट करत तिच्याकडे शारिरिक संबंधांकरिता दबाव टाकणाऱ्या सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी सून घरात एकटी असताना सासऱ्याने तिच्या अंगावर हात टाकून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस सूनेने आरडाओरडा केल्याने सासऱ्याने तिला सोडले. नंतर हा प्रकार पीडित महिलेने (woman) आपल्या पतीला सांगितल्यानंतर त्याने पीडितेची समजुत काढली. परंतू, यानंतर वासनांध सासऱ्याने पुढच पाऊल टाकत आपल्या सुनेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ (Video) शूट केला होता.

व्हिडीओ आपल्या सूनेला दाखवत आरोपी सासऱ्याने सूनेला, तुला माझ्या मुलापासून मुल होणार नाही, तू माझ्याशी संबंध ठेव असे म्हणत दबाव टाकायला सुरुवात केली. माझ्याशी संबंध ठेवले नाही तर हा व्हिडीओ व्हायरल (Viral) करण्याची धमकी देत आरोपी सासरा नेहमी सुनेवर दबाव टाकायला लागला. या दबावाला कंटाळून अखेर सुनेने हा प्रकार आपल्या आई- वडिलांना सांगितला आहे. ज्यानंतर त्यांनी पंढरपूर (Pandharpur) पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी (police) याप्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10th Exam Fess: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ, आता किती फी भरावी लागणार?

Narendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल; मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Raigad Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Pre-Monsoon Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या २४ तासात मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार; IMD अंदाज

SCROLL FOR NEXT