A proud son-in-law rides the gifted Sindhi horse as a unique gesture from his father-in-law during the Dhondya festival in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

सासऱ्याचं भन्नाट गिफ्ट! जावयाला दिला चक्क सिंधी घोडा

Father In Law Gifts Horse To Son In Law In Maharashtra Village: धोंड्याच्या महिन्यात एका सासऱ्यानं आपल्या जावयाला भन्नाट गिफ्ट दिलयं... हे गिफ्ट नेमकं काय आहे? गिफ्ट पाहून जावई कसा हरखून गेलाय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

लाडक्या जावयाला सासऱ्याकडून घोडी गिफ्ट

मामा अन् मामीचा फोन आला...

जावायानं कीक हानली गाडीला...

अन् थेट पोहोचला सासुरवाडीला...

ती बी एकदम सुसाट जागेवर भिंगरी... यातली शॉलेड गोष्ट म्हणजी धोंड्याचा महिना ... मग स्पेशल गिफ्ट मिळणारच की ती बी 100 टक्के खरं

घटना धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या ईट गावची... जावाई क्रांतिसिंहराव... सासूरवाडीला बायकुसंग धोंड्याच्या जेवायला गेलं... जेवण झालं... धोंड्यांच्या महिन्यात सोन्यासारख्या जावायाला सोनं देण्याची पद्धत असती.... पण सोनं गेलंय दीड लाखाच्या पुढं दोन लाखाला मिटी मारायला.... गाडी द्यायची झाली तर पेट्रोल डिझेलचा झालेला इस्कूट समद्यानं बिघितलाय... ट्रम्प तात्याच्या अडग्यापणाचा फटका जावायला का म्हणून सासऱ्यानं लावली अक्कल अन् लढवली शक्कल... अन् पाठवलं सरप्राईज गिफ्ट थेट घरी..

सासरा म्हणला... जावाईबापू स्पेशल गिफ्ट हाय शेतीच्या कामासाठी गोडमाणा ... जावायनं गिफ्ट बघितलं हान हारकूनच गेला... सासऱ्यानं पाठवलंच होतं चार पायाचं रुबाबदार हत्यार... ती बी सिंधी जातीचा घोडा....सासरेबुवाचं गिफ्ट जावाईबापूच्या रुबाबाला अन् नावाला शोभणारच हाय... घोडा बघताच जावायानं बी टाकली टांग अन् मारला फेरफटका एकदम टणाटण... सध्या धोंड्याचा महिना सुरु हाय... समस्त जावाईबापू संघटना सासूरवाडीच्या मार्गावर हाईत...प्रत्येकाला सोन्याचं गिफ्ट मिळल नाय मिळल ही गोष्ट निराळी पण सासऱ्यानं सोन्यासारखी बायकू दिलीय तेवढं इसरु नका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पिंपरीत ६ जणांच्या संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदे यांच्या सभास्थळी घिरट्या मारणारे ड्रोन, पोलिस प्रशासनाने थांबवले

The Maharashtra Files: 'द महाराष्ट्र फाईल्स' वादात, सेन्सॉर बोर्डाकडून कात्री; रिलीजच्या १ दिवसाआधी प्रदर्शनाची तारीख बदलली

इंधन न मिळाल्यानं आईने गमावलं बाळ, पुरेशा इंधनाचा प्रशासनाचा दावा खोटा

Hair Care: केसात खूप कोंडा झालाय? केस खूप गळतायत? मग रोज रात्री झोपण्यापूर्वी केसांवर हा स्प्रे नक्की लावा

SCROLL FOR NEXT