FATHER FIGHTS LEOPARD TO SAVE DAUGHTER; BRAVE ACT RESCUES CHILD FROM DEATH'S JAWS saam tv
महाराष्ट्र

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

Father Saves Daughter From Leopard Attack : राज्यात बिबट्या आणि मानव संघर्ष गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेला असतानाच आता आणखी एक थरकाप उडवणारी घटना समोर आलीये. मृत्यूच्या जबड्यातून आपल्या मुलीला वाचवणाऱ्या जिगरबाज बापाची कहाणी नेमकी काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • मानव-बिबट्या संघर्षाची आणखी एक धक्कादायक घटना

  • एका वडिलांनी बिबट्याशी झुंज देत आपल्या मुलीला मृत्यूच्या जबड्यातून वाचवलं.

  • वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रोहित कदम, साम प्रतिनिधी

एकीकडे जगात 'फादर्स डे' साजरा केला जात असताना दुसरीकडे अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात डोंगरगावमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आलीये. आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी एका बापानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी दोन हात केलेत. रात्रीच्या सुमारास मनोज गुंजाळ यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झडप घातली. आईच्या पाठीवर असलेल्या अवनीला बिबट्यानं तोंडात पकडून अंधाराच्या दिशेने ओढत नेण्यास सुरुवात केली.

मुली आणि आईचा आक्रोश ऐकताच वडील मनोज गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी झुंज देत अवनीची सुटका केली. मात्र, मुलीला कडेवर घेऊन घराच्या दिशेने धावत असताना अंधारामुळे समोरील विहीर न दिसल्यानं बाप-लेक दोघेही थेट विहिरीत कोसळले. ग्रामस्थांनी धाव घेत दोघांनाही विहिरीतून बाहेर काढलं.

बिबट्याच्या हल्ल्यातून बचावलेल्या बाप आणि लेकीवर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, घटनेनं बिबट्यांच्या मानवी वस्तीतील मुक्त संचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात जुन्नरच्या शिरोली गावामध्येही बिबट्याशी झुंज देत एका बापानं आपल्या मुलाची मृत्यूच्या दारातून सुटका केली होती. मात्र, आज वडिलांच्या प्रसंगावधानामुळे एका चिमुरडीचे प्राण वाचलेत.

मुलीसाठी काळ बनून आलेल्या बिबट्याला भिडणाऱ्या या 'बाप'माणसाची सध्या चांगलीच चर्चा रंगलीये. मात्र अहिल्यानगरसह नाशिक, पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांनी ग्रामीण भागात दहशत निर्माण झाली आहे. अशा स्थितीत वनविभागाचा ढिम्मं कारभार चिड आणणारा आहे. बिबट्याला पळवून लावणारी अशी 'बाप' माणसे काही गावात असली तरी या समस्येवर ठोस उपाय कधी काढणार? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT