Father Dies During Celebration Of Daughter Becoming IAS Saam Tv News
महाराष्ट्र

Yavatmal News : माझी लेक कलेक्टर झाली! आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हार्ट ॲटॅक; आनंदी घरावर दु:खाचा डोंगर

Father Dies During Celebration Of Daughter Becoming IAS : लेक कलेक्टर झाल्याच्या आनंदोत्सवावर दुःखाचं सावट पसरलं आहे. प्रल्हाद खंदारे असं मृत्यू झालेल्या बापाचं नाव आहे.

Prashant Patil

यवतमाळ : मुलगी आयएएस (IAS) झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचे हृदयद्रावक निधन झाल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे घडली. लेक कलेक्टर झाल्याच्या आनंदोत्सवावर दुःखाचं सावट पसरलं आहे. प्रल्हाद खंदारे असं मृत्यू झालेल्या बापाचं नाव आहे. खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.

प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकरी म्हणून निवड झाली. मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून साजरा केला जात असताना प्रल्हाद खंदारे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे मुलीच्या आयएएस अधिकारी पदी झालेल्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या खंदारे परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात एका मुलीने आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबीयांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, आनंदात असतानाच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे मुलीच्या यशाचा आनंद आणि कुटुंबातील सदस्यांचा उत्साह दु:खात बदलला. प्रल्हाद खंदारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आयएएस झालेली मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG price : मोठी बातमी! सांगलीत व्यवसायिक गॅस किंमतीचा स्फोट, वाहनांच्या एलपीजी मोठी वाढ

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

SCROLL FOR NEXT