father and son passed away due to electric shock Saam Digital
महाराष्ट्र

विजेचा शॉक लागून बाप-लेकाचा जागीच मृत्यू, शेतात लोंबकळलेल्या विद्युत तारांना झाला स्पर्श

father and son passed away due to electric shock: दाेन्ही विभागातील कर्मचा-यांनी पंचासमक्ष पंचनामा केला आहे. या घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संजय जाधव

विजेचा शॉक लागून बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील मुरादपुर येथे घडली. शेतातील लोंबकळलेल्या विद्युत् तारांना स्पर्श झाल्याने ही दुर्देवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील रामेश्वर उत्तम पडघान (वय 45) आणि त्यांचा मुलगा वैभव (वय 22) हे मुरादपुर येथील गाडेकर यांच्या गावालगत असलेल्या शेतात काम करत होते. परंतु अचानक त्यांचा स्पर्श शेतात लोंबकळलेल्या वीज तारेला झाला.

त्यानंतर दाेघेही जमिनीवर पडले. त्यांचा विद्युत शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिकांकडून तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पाेलिस आणि विद्यु विभाग या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दाेन्ही विभागातील कर्मचा-यांनी पंचासमक्ष पंचनामा केला आहे. या घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT