वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून 6 वऱ्हाडी जागीच ठार, 14 जखमी माधव सावरगावे
महाराष्ट्र

वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून 6 वऱ्हाडी जागीच ठार, 14 जखमी

जिल्ह्यातील सिल्लोड जवळ भीषण अपघातात सहा जण जागीच ठार तर आठ गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: जिल्ह्यातील सिल्लोड जवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार तर आठ गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सिल्लोड ते कन्नड रोड वर एक नादुरुस्त उसाचा ट्रॅक्टर थांबला होता, त्या ट्रॅक्टर वर लग्नाचा वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो धडकला. त्यात टेम्पोचा अक्षरशा चुरा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व जण सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ या गावचे रहिवासी आहेत. लग्नासाठी ते मंगरूळ कडून सिल्लोडला येत असताना हा भीषण अपघात झाला आहे.

वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून 6 वऱ्हाडी जागीच ठार, 14 जखमी

या अपघातात सहा जण जागीच ठार झाले आहेत. 14 जण जखमी झाले आहेत. तर, गंभीर जखमींना सिल्लोड येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मंगरूळ येथील शिवराम मुकुंदा खेळवणे यांचा बुधवारी संध्याकाळी घाटशेंद्रा येथे विवाह होता. वऱ्हाडी पाहुणे लग्न लावून रात्री ही परत मंगरूळ येथे येत होती. झोपेच्या नादात वाहणा वरील नियंत्रण सुटून मोढा फाटा, भराडी रोड या ठिकाणी ऊस असलेले ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभा असताना, रात्रीचे 2.00 वाजताचे सुमारास अशोक लेलँड छोटा पीक अप (क्र. MH 20 CT 2981) सदरील टेम्पो ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकला अशी माहिती मिळत आहे.

वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून 6 वऱ्हाडी जागीच ठार, 14 जखमी

या अपघातामध्ये 6 व्यक्ती मयत झाले असून मयत हे मंगरूळ ता सिल्लोड या गावचे रहिवासासी आहेत. मृतदेह हे सिल्लोड रुग्णालय येथे आहेत.

अपघातात मृत पावलेल्यांची नावे-

1 ) जिजाबाई गणपत खेळवणे, वय 60 वर्ष

2 ) संजय संपत खेळवणे, वय 42 वर्ष

3 ) संगिता रतन खेळवणे, वय 35 वर्ष

4 ) लक्ष्मीबाई अशोक खेळवणे, वय 45 वर्ष

5 ) अशोक संपत खेळवणे , वय 52 वर्ष सर्व रा मंगरुळ ता . सिल्लोड यांचा मोढा फाटाजवळ अपघात झाला असुन त्यांना मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

SCROLL FOR NEXT