- मनोज जयस्वाल
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज (साेमवार) वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनामुळे तिन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ खाेळंबली हाेती.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनास दिलेल्या निवेदनात एप्रिल 2024 कालावधीत उन्हाळी नुकसानीचे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्यात यावे, भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीनला भाव देण्यात यावा, स्प्रिंकलचे सबसिडीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ जमाा करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असल्याने दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई व्हावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रिसोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आंदाेलनस्थळी येऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी, राहुल बोडखे, युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे रवींद्र चोपडे, विकास झुंगरे, जालिंदर देवकर, संजय सदर, गजानन जाधव, रवी जाधव, श्रीरंग नागरे, वैजनाथ रंजवे, बबलू खरात, विनायक शिंदे, पप्पू हेंद्रे, संतोष अण्णा घोडके, गजानन सदर, पुरुषोत्तम रंजवे, दिलीप भांदुर्गे, अरबी खडसे, सय्यद अजमत, हरी बाजड, जगन्नाथ गरकळ , विष्णू कायंदे, विष्णू सरकटे, नितीन खरात, सचिन खरात यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.