Raju Shetty Aakrosh Padyatra Saam Digital
महाराष्ट्र

Farmers Protest: 'स्वाभिमानी'चे आज राज्यभर चक्काजाम आंदोलन, FRP चे ४००, पहिली उचल ३५०० रुपये देण्याची मागणी

Farmers Protest: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Farmers Protest

मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सकाळी साडेदहा वाजल्यापासून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत.

१३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. दि. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर थे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. तरीही ऊस दराचा प्रश्न निकाली निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे आज चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारला ऊस दरावर चर्चा करण्यास वेळ नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांना कोणतास रस दिसत नाही, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. दरम्यान कर्नाटक सीमाभागातही आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कारखानदाराने आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर येत्या रविवार बसून महामार्ग रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

Gastric cancer symptoms: पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणतं लक्षण दिसतं? 99% लोकं या 6 लक्षणांकडे करतात दुर्लक्ष

मोठी बातमी! दिल्लीतील जंतरमंतर आता आंदोलनासाठी बंद; ३ नवीन ठिकाणं जाहीर, भाजप सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT