shirdi, sai baba, flowers, farmers,  saam tv
महाराष्ट्र

Shirdi : आंदाेलकांना सुरक्षा रक्षकांनी घेरलं; साई बाबा मंदिर परिसरात तणावाचं वातावरण (पाहा व्हिडिओ)

आज सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतक-यांनी साई बाबा मंदिर परिसरात आंदाेलन केले.

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

Sai Baba Temple : शिर्डी येथील साई मंदिरात हार - फुल (flowers) प्रसादावरील बंदी उठवावी या मागणीसाठी आज स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांनी हार फुलांसह साईंच्या दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधितांना सुरक्षा रक्षकांनी राेखलं. त्यामुळे विक्रेते आणि संस्थान सुरक्षा रक्षकांमध्ये वादा - वादी झाली. (Shirdi Latest Marathi News)

शिर्डी साई मंदिरात हार - फुले आणि प्रसाद नेण्यास बंदी असल्याने ही बंदी उठवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे साई समाधीवर फुले वाहून गांधिगिरी मार्गाने आंदोलन (aandolan) करण्याचा निर्धार केला हाेता.

संजय काळे कोपरगाव येथील त्यांच्या निवासस्थानापासुन शिर्डी 15 किलोमीटर पायी हार फुलांसह साईबाबा मंदिर परिसरात आले. यावेळी विविध संस्था, संघटनांनी काळे यांना पाठींबा दिला. यामध्ये हिंदू महासंघाचे आंनद दवे यांनी देखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

आज सकाळी साई मंदिरात हार - फुल प्रसादावरील बंदी उठवण्याची मागणी करीत आंदाेलकांनी हार फुलांसह दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदाेलकांनी हुकुमशाहीनं निर्णय घेऊ नका अशा घाेषणा दिल्या. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी आंदाेलकांकडून हार फुलं काढून घेतली. त्यामुळे काही काळ मंदिर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT