बैलगाडा शर्यतीसाठी राहुरीत आंदोलन करताना शेतकरी. 
महाराष्ट्र

शर्यतीसाठी बैल रस्त्यावर, शेतकऱ्यांचे राहुरीत आंदोलन

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. सरकार आणि न्यायालयाने या गोष्टींचा विचार करावा. बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दक्षिण भारतात वेगळा न्याय आणि महाराष्ट्राबाबत का दुजाभाव असा या शेतकऱ्यांचा तसेच बैलगाडामालकांचा सवाल आहे. या शर्यतीला परवानगीसाठी ते थेट रस्त्यावर उतरले.

राहुरी बाजार समितीसमोर शेकडो बैलांसह रस्त्यावर उतरून आंदोलन केले. बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळाली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा अजब मार्ग अवलंबला. त्यांनी बैलांना पोळ्यासारखं सजवलं होतं. त्यानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढून नगर-मनमाड मार्ग अडवला. यावेळी शेतकऱ्यांनी भंडाऱ्याची उधळण केली.Farmers' agitation in Rahuri for bullock cart race

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी या आंदोलनाचे नेतृ्त्व केले. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, रवींद्र हापसे, प्रशांत शिंदे, बाळासाहेब जाधव, महेश लांबे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, सरकारने गो वंश टिकला पाहिजे यासाठी कायदा केला आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली तर शेतकऱ्यांचा छंद जोपासला जाईल. पर्यायाने त्याची जोपासनाही होईल. देशी जनावरे जपण्यासाठी या शर्यतीचा वापर करता येईल. ग्रामीण भागात देव-देवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र जोरात फिरते.Farmers' agitation in Rahuri for bullock cart race

कर्नाटक आणि तामीळनाडू सरकारने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्रानेही कायदा केला आहे. परंतु त्यास न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे ही शर्यत अडखळली आहे. सरकारने शर्यतीसाठी पुढाकार घ्यावा. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बैठक घ्यावी." अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे

Success Story: अनाथाश्रमात वाढला, पैशासाठी वेटर-डिलिव्हरी बॉय झाला, पण जिद्द सोडली नाही; आज IAS ऑफिसर, वाचा संघर्षाची गाथा!

viral video : धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Election : महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? प्रचारसभेत अमित शाहांचे संकेत

SCROLL FOR NEXT