latur, farmer, latur dcc bank, aurad saam tv
महाराष्ट्र

DCC Bank : दिवाळीत शेतकरी कुटुंबावर घाला; जिल्हा बँकेत शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

दीपक क्षीरसागर

Latur News : अतिवृष्टीमुळे शासनाने ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर अनुदान मंजुर केले. दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे बँक खात्यावरील अनुदान घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा धावपळीत आज बँकेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना लातूर (Latur) जिल्ह्यात घडली आहे. (Latur Latest Marathi News)

दिवाळीच्या तोंडावर अनुदान वर्ग केलेले असल्यामुळे कल्याणी माळेगाव येथील शेतकरी गोविंद प्रभाकर पोस्ते हे दिवाळीचा किराणा तरी खरेदी करता येईल या उद्देशाने औराद येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत (latur dcc bank) गेले. शेतकऱ्याच्या खात्यात फक्त प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे जमा असल्याचे सांगितले असल्यामुळे गोविंद यांनी दोन हजार रुपयांची स्लिप भरली. (Maharashtra News)

पैसे काढण्यासाठी आज बँकेत गर्दी हाेती. त्यांना आत लवकर जाता आले नाही. त्यामुळे ते बाहेर उभे होते. त्यावेळीच अचानक त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे ते खाली पडले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. तरीही कल्याणी माळेगावातील काही नागरिकांनी त्यांना खासगी दवाखान्यामध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT