शेतकऱ्याचा नादच खुळा; दीड एकरात बनवली दोन कोटींची विहीर, कारण... विनोद जिरे
महाराष्ट्र

शेतकऱ्याचा नादच खुळा; दीड एकरात बनवली दोन कोटींची विहीर, कारण...

साडे पाच परस खोली तर दहा कोटी लिटर पाण्याची क्षमतेची विहीर

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी नेहमी अस्मानी अन सुलतानी संकटात पिचला जात आहे. मात्र या नेहमीच्या दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी, एका शेतकऱ्याने अजबचं नाद केलाय. तब्बल दीड एक्कर शेतामध्ये, 2 कोटी रुपये खर्च करून विहीर बनवलीय. यामुळं आता 3-4 वर्ष जरी पाऊस झाला नाही, तरी जवळपास 50 एक्करवर शेती बागायती होऊ शकते.

बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात असणाऱ्या, पाडळसिंगी गावचे शेतकरी मारोती बजगुडे. शेतकरी मारोती बजगुडे यांना 12 एक्कर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने, बारामाही पाणी पुरेल अशी काही तरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादीत पाणीसाठा राहतो, त्यामुळे त्यानी आपल्या दीड एक्कर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरविले.

मात्र सुरूवातील यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर यशस्वीपणे मात करत, मारोती बजगुडे यांनी तीन वर्षांपूर्वी ही विहीर खोदण्यासाठी सुरूवात केली होती. सुरूवातीला या विहीरीतून निघालेला मुरूम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना 15 ते 20 लाख रूपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही. हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून, दररोज 80 मजूर यासाठी काम करीत होते. तर 10 हायवा यातील माती व दगड काढण्यासाठी लावण्यात आल्या होत्या. अखेर ही विहीर पूर्ण झाली असून या विहीरीसाठी जवळपास दोन कोटींचा खर्च झाल्याचे बजगुडे यांनी सांगीतले.

या अवाढव्य विहीरीत 10 कोटी लिटर पाणी साठण्याची क्षमता आहे. लांबून पाहील्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो. अशा प्रकारची ही विहीर असून महाराष्ट्रात ती एकमेव ठरण्याची शक्यता आहे.

मारोतीराव बजगुडे यांना असलेल्या 12 एकर शेतीपैकी 8 एकरमध्ये त्यांनी मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहीरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तसेच या विहीरीमुळे भविष्यातील शेतीच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. ही विहीर महाराष्ट्रात एकमेव ठरण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

तर या विहिरीची माहिती मिळाल्याने, विहीर पाहण्यासाठी नागरिक येत आहेत. गाव परिसरासह बीड, गेवराई यासह अनेक ठिकाणाहून ही विहीर पाण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिक येत आहेत. तर विहीर पाहून अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरत नाही. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील मारुती बजगुडे यांचा आदर्श घ्यावा आणि आठ-दहा शेतकऱ्यांमध्ये अशी विहीर खोदावी, जेणेकरून बीड जिल्हा दुष्काळ मुक्त होईल. अशी प्रतिक्रिया पाहण्यासाठी आलेल्या गोवर्धन मांडे यांनी दिली आहे

दरम्यान बीड जिल्ह्यात कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेतात होत्याचं नव्हतं होतं, त्यामुळे सततच्या दुष्काळावर तोडगा काढताना, मारुती बजगुडे या शेतकऱ्यांने तब्बल दोन कोटींची दीड एकर शेतामध्ये विहीर खोदली आहे. त्यामुळे आता ही विहीर बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या स्वरूपाची ही पहिलीचं विहीर असण्याची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी "मारुती बजगुडे यांनी नाद केला पण वाया नाही गेला" असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

SCROLL FOR NEXT