वसई: सिगारेटवरून झालेल्या वादात रिक्षा युनियन अध्यक्षाची बोईसरमध्ये हत्या !

बोईसर या ठिकाणी नालासोपारा येथे राहणाऱ्या रिक्षा युनियन अध्यक्षाची सिगारेटवरून झालेल्या वादात ७ ते ८ इसमांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
विनोद सिंग
विनोद सिंगचेतन इंगळे
Published On

चेतन इंगळे

वसई विरार: बोईसर या ठिकाणी नालासोपारा येथे राहणाऱ्या रिक्षा युनियन अध्यक्षाची सिगारेटवरून झालेल्या वादात ७ ते ८ इसमांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात बोईसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी अध्यक्षाच्या मुलाला आणि भावाला जबर मारहाण केली आहे. त्यांच्यावर नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विनोद सिंग
Arunachal Pradesh: हिमस्खलनात भारतीय लष्कराचे 7 जवान अडकले; बचावकार्य सुरू

नालासोपारा मधिल रिक्शा युनियनचा अध्यक्ष असलेला विनोद सिंग बोईसर, वारांगाडे आपल्या भावाकडे गेला होता. विनोदाचा मुलगा हा त्याच्या भावाकडे राहत असल्याने तो त्याला भेटायला नेहमी जात असे. रविवारी अशाच भेटीसाठी गेला होता. त्याच्या भावाचे याठिकाणी किराणा मालाचे दुकान आहे, रात्री आठच्या सुमारास दुकानात काही इसम आले आणि त्यांनी विनोद सिंग याला सिगारेट मागितली होती, मात्र विनोदने सिगारेट नसल्याचे सांगितले यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि या रागातून ७ ते ८ इसमांनी विनोद सिंग यांना बेदम मारहाण केली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील पहा-

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या भावाला व मुलाला देखील या इसमांनी जबर मारहाण केली. भावाला व मुलाला बोईसर मधिल एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण त्यांना पुढील उपचारासाठी नालासोपारा येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती बोईसर एम आय डीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली सदर प्रकरणात ८ आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विनोद सिंग याचा मृतदेह नालासोपारा मधिल हॉस्पिटल मध्ये आणण्यात आला यावेळी त्याच्या मृत्यूची बातमी कळताच शेकडो रिक्शा चालकांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com