Buldhana Farmer Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana: शेतामध्ये गेले पण परत आलेच नाहीत, शेतकरी पती-पत्नीची आत्महत्या; बुलडाण्यात खळबळ

Buldhana Farmer: बुलडाण्यात शेतकरी पती-पत्नीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. शेतामध्ये जाऊन दोघांनीही गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललं.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या शेतातील झाडाला गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं. कर्जबाजारीपणामुळे दोघेही चिंतेत होते त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या बुलडाणा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील चिखली तालुक्यातील भरोसा गावत ही हृदयद्रावक घटना घडली. या गावात राहणाऱ्या शेतकरी पती-पत्नीने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आलीय. गणेश श्रीराम थुट्टे (वय ५५ वर्षे) आणि रंजना गणेश थुट्टे (वय ५० वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

गणेश आणि रंजना हे दोघे शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या नावावर भरोसा शिवारात सुमारे ५ एकर शेती असून यंदा अल्प पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकांवर हुमणी अळीचा प्रकोप झाला होता. यामुळे पिके हातून जाण्याची शक्यता आणि कर्जाचं वाढतं ओझं यामुळे त्यांनी नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

या शेतकरी पती-पत्नीला एक मुलगा, दोन मुली असून सर्वांची लग्न झालेली आहेत. घटना झाल्यावर पोलिसाने तात्काळ घटस्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी चुलत भाऊ एकनाथ प्रभाकर थुट्टे यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र घटनेमुळे भरोसा गावात शोककळा पसरली आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे होणारे बळी ही गंभीर आणि चिंतेची बाब ठरत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT