बॅंकेचे कर्ज फेडू न शकल्याने अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या... दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

बॅंकेचे कर्ज फेडू न शकल्याने अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या...

लातूर जिल्ह्यातील अल्पभुधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी दोन बँकांकडून दोन लाखांचे कर्ज घेतले होते.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: दोन बँकांचे दोन लाखांचे कर्ज झाल्याने अल्पभुधारक शेतकऱ्याने गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा इथं घडली आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील तरूण अल्पभुधारक शेतकरी तानाजी बाबुराव सुर्यवंशी वय ४५ वर्षे यांनी आपल्या स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (farmer commits suicide by strangulation as he cannot repay bank loan)

हे देखील पहा -

तानाजी सुर्यवंशी मुलीच्या लग्नासाठी आयसीआसीआय बँकेकडून १ लाख ७४ हजार व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अंबुलगा यांचे २० हजार असे एकूण दोन्ही बँकेकडून दोन लाखांचे कर्ज काढले होते. तर बचत गटाचेही कर्ज सदरील शेतकऱ्याने उचले होते. सदरील शेतकऱ्याच्या नावावार एक हेक्टर जमीन असून मागे झालेल्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेले खरीप पीक संपूर्णपणे गेले होते. बँकेचा तगादा व मुलीच्या लग्नाचे देणे या आर्थिक विंवचनेतत सदरील अल्पभुधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत शेतकऱ्याचे वडील बाबुराव सुर्यवंशी यांनी दिलेल्या अर्जावरून औराद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कामत करत आहेत. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परीवार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT