Dhananjay Pawar Meet Sharad Pawar Saamtv
महाराष्ट्र

Dhananjay Powar: रीलस्टार धनंजय पोवार शरद पवारांच्या भेटीला; कोल्हापुरातून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?

Dhananjay Pawar Meet Sharad Powar: कोल्हापूरचे प्रसिद्ध रिल्सस्टार धनंजय पोवार म्हणजेच 'डीपीदा लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. धनंजय पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Gangappa Pujari

Loksabha Election 2024:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी अन् जुळवाजुळव सुरू केली असतानाच कोल्हापूरचे प्रसिद्ध रिल्सस्टार धनंजय पोवार म्हणजेच 'डीपीदा लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. धनंजय पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध असलेले रील स्टार धनंजय पोवार (Dhananjay Powar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची मुंबईतल्या वाय.बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. धनंजय पवार यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जाहगा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने आज होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल असं आश्वासन धनंजय पवार यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी धनंजय पोवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकांउंटवरुनही खासदारकी लढवण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. संधी कधी कुठून कशी मिळेल हे सांगणे अवघड आहे पण मी तयार आहे, असे म्हणत एक युट्युबर इतिहास घडवणार असल्याचे धनंजय पोवार यांनी या रिलमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहे धनंजय पवार? (WHO is Dhananjay Powar?)

डीपी म्हणजेच धनंजय पोवार हे कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील 'सोसायटी फर्निचर' या दुकानाचे मालक आणि व्यावसायिक आहेत. तसेच ते प्रसिद्ध रिलस्टार आणि युट्यूबर म्हणूनही ओळखले जातात. आपल्या विनोदी शैलीतील संवादाने त्यांनी महाराष्ट्रात तुफान लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग असून युट्यूबच्या माध्यमातूनही ते लाखोंची कमाई करतात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT