Nanded News: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना आजही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. नांदेड येथून अशीच एक घटना समोर आली आहे. पानटपरीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सासरच्या मंडळींनी २१ वर्षीय विवाहीतेचा छळ केला आहे. या प्रकरणी वाढवणा पोलिस ठाण्यात शनिवारी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, कौशल्या शहाजी सुडके असे पीडित महिलेचे नाव आहे. पती शहाजी यादवराव सुडके आणि त्याचे कुटुंबीय कौशल्या यांना सतत शिवीगाळ करत होते. पान टपरीचा व्यवसाय (Business) सुरु करण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. मात्र घरची परिस्थिती ठीक नसल्याने त्यांनी नकार दिला. त्यामुळे पतीने शिवीगाळ, मारहाण करत उपाशीपोटी ठेवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
२४ जून २०१९ रोजी नांदेड जिल्ह्यातील येवती येथील शहाजी यादवराव सुडके आणि कौशल्या यांचा विवाह (Marriage) झाला. लग्नावेळी फिर्यादीच्या आई वडिलांनी वर दक्षिणा म्हणून रोख २ लाख रुपये, दोन तोळे सोने व इतर संसारोपयोगी साहित्य देऊन रितीरिवाजा प्रमाणे लग्न लावून दिले होते. विवाहानंतर पतीसह त्या पुणे येथे कामासाठी गेल्या. त्यानंतर बाळंतपणासाठी माहेरी आल्या.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे पती काम करीत असलेली कंपनी बंद पडली. त्यामुळे पानटपरीच्या व्यवसायासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेस पतीने मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी वाढवणा पोलिस ठाण्यात पती शहाजी सुडके आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.