chhatrapati sambhaji nagar Saam tv
महाराष्ट्र

Shocking : महाराष्ट्र की बिहार? मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला; रागात गावगुंडांकडून कुटुंबाला लाकडी दांड्याने मारहाण

Maharashtra Shocking News : संभाजीनगरमध्ये मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला. त्यानंतर गावगुंडाकडून कुटुंबाला लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. गावगुंडांनी हाताचापट्याने, लाकडी दांड्याने आणि लाथांनी पीडितीच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली. छत्रपती संभाजीनगरमधील जोगेश्वरीत ही घटना घडली आहे. बुधवारी रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूरमधील १४ वर्षीय मुलगी, आई, वडील, भाऊ आणि बहिणीसह भाड्याच्या घरात राहतात. आई, वडील खासगी नोकरी करतात. मंगळवारी नववीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी शाळेतून घरी परतत होती. त्यावेळी आरोपी निलेश दुबिले, ऋशिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांनी तिला अश्लील हातवारे केले. तसेच तिचा पाठलाग देखील केला. त्यानंतर पीडित तरुणीने संपूर्ण प्रकार घरी आल्यानंतर कुटुंबीयांना सांगितला. तिची आई घराबाहेर आल्यानंतर तिघेही पळून गेले.

१४ वर्षीय मुलगी बुधवारी सायंकाळी ५ ते ५:३० वाजेच्या सुमारास घराचा ओटा झाडत होती. त्यावेळी निलेश दुबिले, ऋशीकेष दुबिले, प्रतीक राजुपत हे तिला पाहून 'ये शुक शुक' असा आवाज देऊन तिच्या मनात लज्जा वाटेल, असे कृत्य केले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिघांना विचारणा केली. त्यानंतर तिघांनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच हातात येईल, त्याने पीडित मुलीच्या आईला छातीवर लाथाने आणि डोक्यात काहीतरी मारून जखमी केले.

वडिलांनाही ते तिघे मारत असताना प्रविण डिगंबर काजळे, कृष्णा काजळे, सतिश काजळे हे भांडण सोडवण्यास आले. तेव्हा त्या तिघांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. त्या तिघांसोबत आणखी काही मुले असण्याचा संशय आहे. मारहाण करत असताना लोकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी निलेश दुबिले, ऋशिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

SCROLL FOR NEXT