Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Fake Video: लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवत आहेत. शाहू महाराज आणि कोल्हापूरची गादी या संदर्भात अज्ञातांनी 'साम' टीव्हीचा लोगो वापरून आक्षेपार्ह बातम्या समाज माध्यमांवर पसरवल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur News:

>> रणजीत माजगावकर

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवत आहेत. शाहू महाराज आणि कोल्हापूरची गादी या संदर्भात अज्ञातांनी 'साम' टीव्हीचा लोगो वापरून आक्षेपार्ह बातम्या समाज माध्यमांवर पसरवल्या आहेत. या खोट्या बातम्यांच्या माध्यमातून शाहू महाराज छत्रपती आणि 'साम' टीव्हीची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

याची गंभीर दखल घेत 'साम' टीव्हीने शाहू महाराज आणि साम टीव्हीची यांची बदनामी करणाऱ्या अज्ञाता विरोधात कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. सायबर गुन्हे अंतर्गत कोल्हापूर राजारामपुरी पोलीस या अज्ञाताचा शोध घेत आहेत.

'साम टीव्ही'ने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे की, ''सध्या लोकसभा निवडणूक सुरू असून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवीत आहेत. शाहू महाराज यांच्याबद्दल तसेच त्यांच्या गादी संदर्भात सुरू असलेला वाद या दोन्ही गोष्टींचा फायदा उचलत अज्ञातांकडून 'साम' टीव्ही च्या नावाने खोट्या आक्षेपार्ह बातम्या तयार करण्यात आल्या असून त्या समाज माध्यमांवर प्रसारित केल्या जात आहेत. या बातम्यांद्वारे कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती आणि शाहू घराण्याची बदनामी करण्याचा उद्देश दिसून येत आहे. 'साम' टीव्ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध प्रसार माध्यम आहे. या माध्यमाचा 'लोगो' वापरून अशा पद्धतीने आक्षेपार्ह बातम्या अज्ञातांकडून तयार केल्या असून त्या व्हाट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुप वर पाठवण्यात येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या बातम्यांमुळे लोकांमध्ये 'साम' टीव्ही संदर्भात गैरसमज निर्माण होत आहेत. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची बदनामी करण्याच्या उद्देशानेच अशा पद्धतीने बातम्या तयार करून त्या प्रसारित केल्या जात आहेत.''

तक्रारीत सांगण्यात आलं आहे की, ''याचबरोबर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाची क्लिप सध्या 'साम' टीव्हीचा लोगोचा वापर करून प्रसारित केली जात आहे. या भाषणामध्ये देखील बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शाहू महाराज आणि यांच्या गादी संदर्भात विधान केलेला आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ साम टीव्हीच्या नावाने प्रसारित करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने अज्ञातांकडून हे उद्योग सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे.''

या पुढे लिहिलं आहे की, ''राजर्षी शाहू महाराज यांनी संपूर्ण देशासाठी खूप मोठं विधायक काम करून ठेवले आहे. त्यांचे वारसदार सध्याचे शाहू महाराज छत्रपती हे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत आज्ञातांनी शाहू महाराज आणि कोल्हापूरची गादी यांचा अपमान व्हावा तसेच लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी या उद्देशाने हे व्हिडिओ सध्या 'साम' टीव्ही च्या नावाने प्रसारित केले जात आहेत. या व्हिडिओचा 'साम' टीव्हीशी कोणताही संबंध नाही. 'साम' टीव्ही कडून अशा पद्धतीचे कोणतेही व्हिडिओ अथवा बातम्या प्रसारित करण्यात आलेल्या नाहीत. अशा पद्धतीने समाज माध्यमांचा वापर करत लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी अज्ञातंकडून अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करण्यात येत असून त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी, अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT