Fake TC Saam Tv News
महाराष्ट्र

Fake Ticket Collector: अमरावती पुणे एक्स्प्रेसमध्ये बोगस टीसी, विद्यार्थ्यांनी धडा शिकवला; नेमकं काय घडलं पाहा

Pune to Amravati Express: पुण्यावरून अमरावतीला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये काही प्रवासी विद्यार्थ्यांनी बोगस टीसीचा प्रताप उघडकीस आणला आहे. दिनेश महाडीक असे तोतया टीसीचे नाव आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यावरून अमरावतीला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये काही प्रवासी विद्यार्थ्यांनी बोगस टीसीचा प्रताप उघडकीस आणला आहे. दिनेश महाडीक असे तोतया टीसीचे नाव आहे. टीसी तोतया असल्याचं उघड झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी टीसीला ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थ्यांनी तोतया टीसीचा प्रताप उघडकीस आणल्यानंतर त्याचं कौतूक करण्यात येत आहे.

हिंगोलीमध्ये एक्सप्रेस रेल्वेमध्ये बोगस टीसीचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. ही एक्सप्रेस पुण्याहून अमरावतीला जात होती. दरम्यान हिंगोलीमध्ये एका तोतया टीसीचा भंडाफोड काही विद्यार्थ्यांनी केला आहे. दिनेश महाडिक असं तोतया टीसीचे नाव आहे.

तोतया टीसी चक्क रेल्वे विभागात नियुक्त असल्याप्रमाणे यूनिफॉर्म घालून आला. नंतर प्रवाशांच्या तिकीटांची चौकशी करू लागला. तिकीटांची चौकशी करत असताना, त्यानं मद्यपान केलं असल्याचं काही प्रवाशांना आढळून आलं. त्यावेळेस काही प्रवासी तोतया टीसीकडे संशयाच्या नजरेनं पाहू लागले.

त्यानंतर काही प्रवाशांनी तोतया टीसीकडे आयडी कार्डची मागणी केली. 'माझ्याकडे आयडी कार्ड नाही, मी का आयडी कार्ड दाखवू' अशा उर्मट भाषेत उत्तर दिलं. नंतर त्यानं काही प्रवाशांना दमदाटीही केली. टीसीचं हे वागणं काही प्रवाशांना संशयास्पद वाटलं. या प्रकरणी काही प्रवाशांनी याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तोतया आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT