ही दृश्य आहेत, छत्रपती संभाजीनगरच्या वंजारवाडीमधील एका गोडाऊनमधली... या गोडाऊनमध्ये नामंकित कंपनीच्या नावाखाली बनावट खतांची बाजारात राजरोसपणे विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...साम टिव्हीला याप्रकरणाची माहिती मिळताच सामची टीम थेट बनावट खताचं रॅकेट चालवणाऱ्य़ा कारखान्यावर पोहचली...सामच्या प्रतिनिधीनं तिथल्या एका कामगाराला बोलत केल आणि कारखान्यातील धक्कादायक वास्तव समोर आल.....
दरम्यान नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट खतांचा गोरखधंदा कसा सुरू होता...
संभाजीनगरमधील वंजारवाडीतील एका गोडाऊनमध्ये नामांकित कंपन्यांच्या छापील रिकाम्या बॅगमध्ये बनावट खत भरून विक्रीस पाठवलं जात होतं...
500 रुपये सिंगल सुपर फॉस्फेट हे खत 2 हजार रुपये किमतीच्या बागेत भरलं जात होतं. जे खत शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी आहे.
कृषी विभागाने धाड टाकून तब्बल 14 हजार 355 रिकाम्या छापील खत बॅगा जप्त केल्या.. धक्कादायक म्हणजे डीएपी, एनपीके, युरिया आणि एमओपी बॅगांमध्ये हे खत भरलं जात होतं.
त्यासोबतच ग्रॅन्युलर खताच्या 320 बॅग , पांढऱ्या पावडर भरलेल्या 553 बॅग, एसएसपी खताच्या700 बॅग , युरिया खत, शिवण मशिन आणि पॅकिंग साहित्य छाप्यामध्ये सापडले.
तर दुसरीकडे बनावट आणि भेसळयुक्त खत बाजारात आणूनच शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे असं नाही तर शेतकऱ्यांच्या नावावर सबसिडी मार्फत जे युरिया खत मिळतं ते खतही उद्योगाला महागड्या दरात विकण्याचा धंदा या कारखान्यावर सुरू होता.
जे युरिया खत 6 रुपये किलोने सबसिडीसह शेतकऱ्यांना मिळतं, ते खत इंडस्ट्रीला 74 रुपयांनी विकलं जात होतं. त्यासाठी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा वापर केला जात होता. त्यामुळे बनावट अशा भेसळयुक्त खताच्या माध्यमातून तब्बल 4 ते 10 पट पैसे कमावण्याचा धंदा सुरू असल्यानं पेरणीच्या काळात शेतकऱ्यांची फसवणुक झालीय...
कृषी विभागानं टाकलेल्या या छाप्यानंतर अनिल बालाप्रसाद मंत्री आणि सचिन निंफळ यांच्यासह बालाजी फॉस्फेट कंपनी आणि गणेश कृषी उद्योग यांच्याविरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकंच नाहीतर या बनावट खतांच्या विक्रीची मोडस ऑपरेंडीचं कृषी विभागानं समोर आणलीय....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.