Collectors Fake Facebook Account  saam tv
महाराष्ट्र

Fake Facebook Account: राज्यातील जिल्हाधिकारी हॅकरच्या टार्गेटवर? ३ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट

Collectors Fake Facebook Account : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेययांच्या नावााने बनावट फेसबूक अकाउंट उघडण्यात आले आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर, डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar/Nagpur News: फेसबुक हॅकरकडून महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे. राज्यातील तीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेययांच्या नावााने बनावट फेसबूक अकाउंट उघडण्यात आले आहे. आस्तिककुमार पांडेय यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. बनावट अकाउंटवरून आलेली फेसबूक फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्वीकारू नये असे आवाहन देखील आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे. (Marathi Tajya Batmya)

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांव्यतिरिक्त यवतमाळ आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने देखील बनावट फेसबूक अकाउंट बनवल्याची घटना उघडकीस आली आहे. (Latest Political News)

नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांचं फेसबूक अकाउंट हॅक झालं आहे. विपीन ईटनकर यांचा फोटो वापरुन नवीन अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. फेक फेसबूक अकाऊंटला रिस्पॅान्स न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी केले आहे. यापूर्वीही विपीन ईटनकर यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं. त्याबाबत त्यांनी सायबर सेलकडे तक्रार देखील केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT