fake ₹500 notes circulation in Akola Saam
महाराष्ट्र

Fake Currency : ₹५०० च्या बनावट नोटा आढळल्या, महाराष्ट्रात उडाली खळबळ, कोणत्या जिल्ह्यात काम करतेय रॅकेट?

fake currency Akola : अकोटमध्ये एका दुकानदाराला बनावट ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा रंगली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

fake ₹500 notes circulation in Akola : अकोल्यातील मार्केटमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा आल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. कारण, अकोल्यातल्या अकोट शहरात एका छोट्या व्यावसायिकाला तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने बनवाट ५०० आणि १०० रूपयांच्या नोटा देऊन गंडवल्याचं प्रकरण सोशल मीडियावर मोठं चर्चेत आलं आहे. या प्रकारानंतर अकोल्यात बनावट नोटाचं मोठं रॅकेट काम करतेय का? असा सवाल उपस्थित झालाय. (How to identify fake ₹500 note)

दरम्यान, बनावट नोटा देऊन फसवणूक करण्याचा प्रकार अनेकदा समोर येतो. या नोटा बहुतांश ५०० किंवा १०० रुपयांच्या असतायेत.. या हुबेहुब बनवण्यात आलेल्या नोटांमुळे अनेक नागरिकांसह किरकोळ व्यवसायिकांना गंडवले जात आहे. अकोटमध्येही नर्सिंग महाराज रस्त्यावर एका चप्पलच्या दुकानदाराला तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या महिलेने या बनावट नोटा देत फसवणूक केली. पण अकोल्यात बनावट नोटा कुठून आल्या? असा सवाल अकोल्यात उपस्थित केला जात आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात शनिवारी 500 रूपयांची बनावट नोटा चलनात दिसून आली. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. शहरातील नरसिंग मार्गावरील एका चपल दुरूस्ती करणाऱ्या व्यावसायिकाला एका महिला ग्राहकाने ५०० आणि १०० रुपयांची बनावट नोट दिली. त्या व्यवहारानंतर दुकानदाराच्या ही बाब दुसर्‍या दिवशी लक्षात आल्याचे समजले. नोटा मोजत असताना ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा एकदा अकोट शहरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जातीय. कारण, 20 जुलै 2025 रोजी अकोट शहरातल्या श्रीराम सुपर शॉपीमध्ये एका महिलेने दुकानदाराला 500 रुपयांच्या बनावट नोटा देत गंडवलं होतंये.

स्कार्फ बांधून आलेल्या अनोळखी महिलेने गर्दीचा फायदा घेत दुकानदाराची फसवणूक केली होती. आता अनेक मुख्य बाजारपेठेसह छोट्या दुकानांसह रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना या बनावट नोटा देत फसवणूक करीत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र आहेय. दरम्यान, हुबेहूब शंभर, पन्नास, 500 रुपयांसारख्या दिसणाऱ्या या बनावट नोटा महिलांकडून चलनात पसरवल्या जात असल्याचे दिसून येतं आहेये..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Accident : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, मित्राच्या साखरपुड्याला निघाले, पण ३ मित्रांचा वाटेतच घात

Famous Actress Wedding : मालिकेच्या सेटवर सुरू झाली लव्ह स्टोरी, ४ वर्ष केलं डेट; प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्न बंधनात, पाहा VIDEO

Sambhajinagar: नवरा- बायकोचा ट्रॅफिक पोलिसावर हल्ला, भररस्त्यात शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

PM Mudra Yojana: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज

SCROLL FOR NEXT