DGIPR Fact Check on Viral Maharashtra Zilla Parishad Peon Recruitment Claim Saam tv News (AI)
महाराष्ट्र

Fact Check : राज्यातील जिल्हा परिषदेत शिपाई भरती, पगार २५ हजार; नेमकं सत्य काय? जाणून घ्या

peon jobs viral message fact check : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये शिपायांची भरती आणि २५ हजार रुपये पगार मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, DGIPR ने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. नेमकं सत्य काय? जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

DGIPR Fact Check, ZP Bharti Latest News : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये कंत्राटी तत्त्वावर शिपाई पदासाठी मोठी भरती सुरू असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. अशी कोणतीही राज्यव्यापी भरती जाहीर करण्यात आलेली नाही, असे महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. DGIPR ने या व्हायरल मेसेजचं फॅक्ट चेक केलं असून हा दावा खोटा असल्याचं सांगितले आहे.

व्हायरल पोस्ट काय आहे? त्यात नेमका काय दावा केला आहे?

'जिल्हा परिषद व पंचायत समिती' अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी तत्त्वावर शिपाई पदासाठी तात्काळ भरती सुरू असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पदाचे नाव: शिपाई

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

जागांची माहिती: प्रत्येक जिल्हा परिषदेत २० जागा आणि प्रत्येक पंचायत समितीत १० जागा

शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण

वेतन: दरमहा २५,००० रुपये

Maharashtra Zilla Parishad peon recruitment

व्हायरल पोस्टमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, १० वी व १२ वीची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि चारित्र्य प्रमाणपत्र अशी कागदपत्रेही नमूद करण्यात आली आहेत.

व्हायरल मेसेजचं नेमकं सत्य काय?

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २० आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये १० पदे अशा स्वरूपाची कोणतीही राज्यव्यापी भरती ग्रामविकास विभाग, कोणत्याही जिल्हा परिषद अथवा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

सध्या शिपायांसह चतुर्थश्रेणी पदांची नियमित भरती सध्या आहे. रिक्त पदे कंत्राटी किंवा बाह्यस्रोत पद्धतीने भरण्याची प्रक्रिया प्रत्येक जिल्हा परिषद स्वतंत्रपणे राबवते. त्यामुळे हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहा!

आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि दिवसभरात सात ते आठ तास स्मार्टफोनवर वेळ घालवला जातो. व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर शेकडो मेसेज येतात आणि त्यातून वेगवेगळे दावे करून दिशाभूल केली जाते. मात्र, सोशल मीडियावरील अनधिकृत जाहिराती किंवा पोस्टवर अवलंबून राहू नका. आरोग्य, नोकरभरती अथवा इतर कोणत्याही माहितीसाठी फक्त अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवा. कोणतीही माहिती समोर आल्यावर तिची खात्री केल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका; अन्यथा तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरातील बॅनरबाजीवरून मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला फटकारे

Bomb Threat : महाराष्ट्रात बॉम्बस्फोटांच्या धमक्यांनी खळबळ; मुंबईसह अनेक शहरांतील न्यायालये आणि सरकारी कार्यालयांना धमकीचे मेल

Pakistani Series Ban in India: नेटफ्लिक्स इंडियावरील पाकिस्तानी वेब सीरिज वादात; भारतात बंदीसाठी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

पुस्तकप्रेमींसाठी सुवर्णसंधी! कलिना कॅम्पसमध्ये मुंबई पुस्तक महोत्सवाची ज्ञानयात्रा; काय असणार खास?

Property Card : मुंबई-पुण्यातील फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! राज्यातील प्रत्येक फ्लॅटला प्रॉपर्टी कार्ड; वाचा फायदे

SCROLL FOR NEXT