Rent Agreement New Rules Saam
महाराष्ट्र

Rent Agreement : नवा कायदा, डिपॉझिट जास्त घेततल्यावर घर मालकावर कारवाई होणार, वाचा नेमकं सत्य काय?

Rent Agreement New Rules : घर भाड्याने देताना जास्त डिपॉझिट घेतल्यास घरमालकावर कारवाई होणार असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण सध्या असा कोणताही कायदा लागू झालेला नसून हा दावा कितपत खरा आहे याची पडताळणी जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Fact Check on Viral Message About Landlord Deposit Limit : आम्ही व्हायरल मेसेजची पडताळणी करतो आणि सत्य समोर आणतो...आता दावा करण्यात आलाय की घर भाड्याने देताना जास्त डिपॉझिट घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे...खरंच असा कायदा तयार करण्यात आलाय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

घरामध्ये भाडेकरू ठेवत असाल तर नवीन नियमांचं पालन करा, नाहीतर घर मालकाला मोठा दंड भरावा लागेल...कारण, आता नवीन कायद्यानुसार अनेक नवे नियम लागू करण्यात आलेयत...डिपॉझिट अधिक घेतल्यास घरमालकावर दंडात्मक कारवाई होऊ शकते असा दावा केलाय...पण, खरंच असा नवीन कायदा लागू झालाय का...? कारण, अनेक जण घर भाड्याने देतात...त्यामुळे आम्ही याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

नवीन भाडे कायद्यानुसार, घरमालक 2 महिन्यांपेक्षा जास्त भाडे घेऊ शकत नाही. कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय भाडेकरूंना घराबाहेर काढता येत नाही.नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मालकांना दंड लागणार.

हा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे हजारो घरमालकांना याची सत्यता सांगणं गरजेचं आहे...असा कायदा कधी लागू झाला...खरंच अशी मालकावर दंडात्मक कारवाई होऊ शकते का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली...यावेळी काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मॉडेल टेनेन्सी कायद्यावर आधारित नियम तयार केल्याचं आढळून आलं. पण, महाराष्ट्रात असा कायदा लागू आहे का ? याबाबत कायदेतज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय पाहुयात...

साम इन्व्हिस्टिगेशन

नवीन भाडे कायद्याचा मसूदा तयार केलाय

भाडेकरू-मालकातील वाद होऊ नयेत यासाठी प्रयत्न

मॉडेल रेंट अॅक्ट असं नाव देण्यात आलंय

अजून हा कायदा अंमलात आलेला नाही

नव्या कायद्यानुसार मालकाला 2 महिन्याचे भाडे डिपॉझिट घेता येईल

अजून हा कायदा लागू झालेला नाही...पण, कायदा लागू झाल्यानंतर भरमसाठ डिपॉझिट घेणाऱ्यांवर निर्बंध येणार आहेत. आणि नियमांचं उल्लंघन केल्यास मालकावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. सध्या तरी असा कोणताही कायदा लागू झालेला नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत जास्त डिपॉझिट घेणाऱ्या मालकाला दंड बसणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. कायदा लागू झाल्यानंतर मात्र, दंड लागू शकतो...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांना अर्धसत्य माहिती मिळतेय”

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Pink Sauce Pasta Recipe: रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी आणि चटपटीत 'पिंक सॉस पास्ता' घरीच बनवा; वाचा रेसिपी

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

SCROLL FOR NEXT