लाकडापासून बनवली हुबेहूब शिवशाही; महाडच्या अवलिया सुताराची किमया Saam TV
महाराष्ट्र

लाकडापासून बनवली हुबेहूब शिवशाही; महाडच्या अवलिया सुताराची किमया

हातात कला असली की त्याचा योग्य उपयोग आणि मेहनत घेतली तर अनेक आकर्षक कला सादर केल्या जाऊ शकतात हे जयराम सुतार यांनी दाखवून दिले आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड : जिल्ह्यात सध्या चर्चा होत आहे ती अवलिया जयराम सुतार यांनी लाकडापासून बनविलेल्या आकर्षक आणि हुबेहूब शिवशाही बसची. महाड तालुक्यातील नडगाव येथील सुतारकाम करणाऱ्या जयराम सुतार यांनी ही बस बनवली असून आपल्या कलेचा आविष्कार दाखविला आहे. वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचा सुतार यांना छंद असून जिल्ह्यासह राज्यात त्याच्या कामाची ख्याती आहे. याबाबत घेतलेला हा आढावा.

हातात कला असली की त्याचा योग्य उपयोग आणि मेहनत घेतली तर अनेक आकर्षक कला सादर केल्या जाऊ शकतात हे जयराम सुतार यांनी दाखवून दिले आहे. जयराम सुतार हे 25 वर्षापासून सुतारकाम करून आकर्षक फर्निचर बनवत आहेत. त्याच्याकडे 20 ते बावीस प्रकारच्या कला आहेत. नवीन काहीतरी करण्याची त्यांना आवड असल्याने कामासोबत त्यांनी आपला कलेचा छंद ही जोपासला आहे. या कला सादर करण्यासाठी ते कोणाचीही मदत न घेता स्वतः साकारत आहेत. याआधी जयराम सुतार यांनी लाकडापासून लक्जरी बस तयार केली होती. ही पाहून एका ग्राहकाने त्याच्या घरी मारुती इस्टिम कार बनविण्यास सांगितली आणि तेही चॅलेंज जयराम यांनी घेऊन लाकडी मारुती इस्टिम बनवली.

मारुती इस्टिम बनविण्यास त्यांना पंधरा ते वीस दिवस लागले आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर जयराम यांनी शिवशाही बनविण्याचा निर्धार केला. शिवशाही बस बनविण्यास जयराम याना 30 दिवसांचा कालावधी लागला. सुतार यांनी हुबेहूब लाकडापासून शिवशाहीची प्रतिकृती बनवली आहे. विशेष म्हणजे शिवशाही बसचा वापर त्यांनी वस्तू ठेवण्यासाठीही केला आहे. बसला तीन ड्रॉव्हर केले आहेत. त्यामुळे शिवशाहीचा वापर हा कलेसोबत घरातील वस्तू ठेवण्यासाठी केला जात आहे. तर लॅक्जरी बस, मारुती इस्टिम कार या आकर्षक बनविल्या असून त्याचाही वापर ग्राहक काहींना काही वस्तू ठेवण्यासाठी करीत आहेत. जयराम सुतार यांनी घरामध्येही कमी जागेचा वापर व्हावा यासाठीही अनेक लाकडी फोल्डींग फर्निचर बनविलेले आहे.

जयराम सुतार याच्या या कलेने जिल्ह्यासह राज्यातही त्यांचा नाव लौकिक वाढला आहे. सुतार काम करताना फक्त फर्निचर ना बनविता त्या व्यवसायातही नावीन्य पूर्ण कल्पना सुतार साकारत असल्याने ग्राहकांही घरात नवीन आकर्षक वस्तू बनविण्यासाठी जयराम सुतार यांच्याकडे जात आहेत. सुतार यांनी आपल्या व्यवसायातुन कलेचा छंद जोपासला असल्याने यामुळे महाड सह रायगडचे नावही उंचावले जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, त्याच सूटमध्ये २४ तास आधीही रंगली होती पार्टी

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

गेट ओलांडून घरात गेली अन् क्षणातच भिंत कोसळली; महिला थोडक्यात बचावली; VIDEO

SCROLL FOR NEXT