EXPLAINER: OPERATION TIGER COMPLETE; WHAT NEXT? CAN UDDHAV THACKERAY STOP FURTHER EXITS? saam tv
महाराष्ट्र

Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

Explainer Maharashtra Operation: ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले आहेत. 'ऑपरेशन टायगर'ची झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी नवे संकेत दिलेत. तसेच या ऑपरेशनमुळे एकनाथ शिंदेंची ताकद वाढली असून फडणवीसांनाचेही टेन्शन वाढलंय.

Bharat Jadhav

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ६ बंडखोर खासदारांनी आज अखेर शिंदेसेनेत प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या सर्व खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान या पक्ष प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्याचा विश्वास देखील व्यक्त केला. मात्र त्याचबरोबर दुसऱ्या ऑपरेशनची चर्चा सुरू झाली. त्याचे कारण म्हणजे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आणि शिंदे गटातील नेत्यांनी केलेली विधाने. ऑपरेशन टायगर झाले असताना आणि दुसऱ्या ऑपरेशनची चर्चा चालू झाली, त्यामुळे काय उद्धव ठाकरे पुढील ऑपरेशन आणि एकनाथ शिंदेंचे डावपेच आणि नेत्यांची गळती रोखू शकतील असा प्रश्नही जाणकारांसह कार्यकर्त्यांना पडला आहे.

काय म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे?

शिवसेनेत प्रवेश केलेले सहा खासदार हे अनुभवी आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल. अनेकवेळा ते निवडून आलेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आणि शिवसेनेवर विश्वास ठेवला त्यांचे आभार मानत शिंदेसाहेब त्यांची विकासकामे पूर्ण करून देतील. त्यांना पुरेसा विकासनिधी उपलब्ध करून देतील असं श्रीकातं शिंदे म्हणालेत.

नवीन सहा खासदार पक्षात आल्यामुळे लोकसभेत शिवसेनेची ताकद वाढली असल्याचं म्हणताना श्रीकांत शिंदे यांनी पुढे आणखी ऑपरेशन होऊ शकतात असे संकेत दिलेत. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले पुढे काही ऑपरेशन होणारे असतील किंवा होतील त्याची कल्पना नक्कीच दिली जाईल.

रामदास कदम यांचा मोठा दावा

ठाकरे गटातील फुटीर खासदार शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधी शिवसेनेतील नेते रामदास कदम यांनी एक मोठा दावा केला. ठाकरे गटातील सातवा खासदारही फुटणार असल्याचं म्हटलं. रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ६ नाही तर ७ खासदारांनी स्वाक्षरी केल्या आहेत. ठाकरेंचा सातवा खासदार देखील फुटणार असून हा खासदार सध्या काठावर असल्याचं म्हटलं होतं.

खासदारांवर कारवाई होणार

एकीकडे आणखी एका खासदाराची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाकडून खासदारांच्या अपात्रतेच्या कारवाई केली जाणार आहे. लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान मोठ्या संख्येने खासदार सोडून गेल्यामुळे, लोकसभेतील या गटाचे संख्याबळ आता केवळ तीन सदस्यांवर आले आहे. मूळ शिवसेना संघटनेवरील नियंत्रण आधीच गमावलेल्या ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का आहे.

ऑपरेशन ३.२ मध्ये नगरसेवकांना फोडणार?

सहा खासदारांनी बंडखोरी केली होती,त्यावेळी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही अजून काही नेते शिंदे गटातील येतील असा दावा केला होता. ठाकरे गटातील खूप मोठा असंतोष आहे. नगरसेवक, आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे ते सर्व येणार आहेत असं म्हस्के म्हणाले होते.

आमदारही फुटणार शिंदे गटाचा दावा?

खासदारांनंतर आता आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे १४ आमदार फुटणार असून ते शिंदे सेनेत प्रवेश करतील असा दावा आमदार संतोष बांगर यांनी केला. संतोष बांगर यांच्या दाव्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाच्या आमदार फुटणार असल्याचे संकेत दिलेत.

ठाकरेंच्या आमदारांची बैठक

खासदारांनंतर आमदारांमध्येही नाराजी आहे आणि तेही बंड करू शकतात अशीच चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सोमवारी आमदारांची बैठक बोलवली होती. त्यात त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. दरम्यान या बैठकीत तीन आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं.

एकनाथ शिंदेंच्या वाढत्या ताकदीमुळे राजकीय समीकरणे बदलतील

राजकीय विश्लेषकांनुसार २०२२ मधील फुटीनंतर कायदेशीर आणि निवडणूकविषयक संघर्ष होऊनही, शिवसेनेचा पारंपरिक जनाधारावर शिंदेंचे संघटनात्मक वर्चस्व कायम आहे. या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीमधील सत्तेचे समीकरणही बदलू शकते. शिंदे यांचा वाढता प्रभाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भाजप नेतृत्वावरील दबाव वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी आपला राजकीय विस्तार करण्याची आणि एक महत्त्वाचा मित्रपक्ष म्हणून टिकून राहण्याची आपली क्षमता सिद्ध केलीय.

शिंदे मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतात

मुख्यमंत्रिपदावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात असलेला संघर्ष अनेकांना माहितीये. आता खासदारांच्या वाढलेल्या संख्येमुळे मुख्यमंत्रीपदावरील शिंदे यांचा दावा अधिक बळकट होऊ शकतो. राज्याच्या सर्वोच्च पदावर परतण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असल्याचे मतही अधिक दृढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black & White : 'खालिद का शिवाजी' चित्रपटावर सरकारनं बंदी का आणली? दिगदर्शकाचा मोठा खुलासा

PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

SCROLL FOR NEXT