Examination Of Teachers Saam TV
महाराष्ट्र

Examination Of Teachers: आता शिक्षकांचीच घेतली जाणार परीक्षा; तारीख जाहीर

जिल्हा परिषद शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचीच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

Ruchika Jadhav

Beed News: मराठवाड्यातल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची प्रेरणा परीक्षा 30 आणि 31 जुलै रोजी होणार आहे. त्यासाठी 23 हजार शिक्षक प्रेरणा परीक्षा देणार आहेत. शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरत चालल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा परिषद शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचीच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. (Latest Marathi News)

शिक्षकांची ही परीक्षा (Exam) एक तासाची राहणार असून त्यात पन्नास प्रश्न विचारले जाणार आहेत. यात निगेटिव्ह मार्किंग लागू असणार आहे. चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी. २५ गुण वजा करण्यात येणार आहेत. शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ आणि विकसित व्हावी या हेतूने प्रेरणा परीक्षा घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

सध्या इंटरनेटचे जग आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करण्याची सवय लागलीये. ऑनलाईन पद्धतीने शिकवताना शिक्षकांसाठी (Teachers) देखील हा मोठा टास्क होता. त्यामुळे प्रत्येक शाळेतून वारंवार शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात आलं. मात्र तरी देखील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलेला अभ्यास निट समजत नसल्याच्या तक्रारी आल्यात. त्यामुळे आता शिक्षकांची परिक्षा होणार आहे.

शिक्षक संघटनेकडून विरोध

शिक्षकांना दिलेल्या ट्रेनिंगमधून आतापर्यंत त्यांनी किती ज्ञान आत्मसात केलंय हे यावरुन समजणार आहे. प्रेरणा परिक्षेसाठी अनेक शिक्षकांना होकार आणि संमती दर्शवली आहे. मात्र प्रहार शिक्षण संघटनेनं यासाठी विरोध दर्शवला आहे. परिक्षा घेण्यामागील निर्णय स्पष्ट सांगण्यात आलेला नाही असं त्यांचं म्हणण आहे. आपला या परिक्षेला विरोध असल्याचे निवेदन देखील त्यांनी आयुक्तांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांची तांडा वस्तीत दिवाळी साजरी

सकाळ सकाळ मुंबईकरांचे हाल, फटाक्यामुळे रेल्वे सिग्नलला आग; पश्चिम रेल्वे ३५ मिनिटे उशिराने

आगीचे तांडव! मुंबई, ठाण्यासह राज्यभरात २५ हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना; ठाण्यात रॉकेटवर बंदी, नवी मुंबईत प्रदूषण वाढले

Weather Update: थंडी आली रे! अखेर राज्यात थंडीची जोरदार चाहूल; निफाडचा पारा घसरला, तुमच्या भागात काय आहे स्थिती?

Monday Horoscope : पैसा येण्याचे मार्ग मोकळे! 5 राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT