SSC Exam Result Today : आज दहावीचा निकाल! कुठे आणि कसा पाहता येईल निकाल? सविस्तर वाचा

Maharashtra SSC Board exam result: पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
ssc result
ssc result saam tv

SSC Result Announce : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या परीक्षेच्या निकाल (SSC Exam) आज जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालकडे लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं लक्ष लागलं आहे.दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.  (Latest Marathi News)

ssc result
Mumbai Local Train Theft: चपलांमुळं अडकला सापळ्यात... तपास चक्रावणारा, मुंबई लोकलमधील २ लाखांच्या मोबाइल चोरीचा उलगडा

राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८,४४,११६ विद्यार्थी तर ७,३३,०६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली होती.

निकाल कुठे पाहता येणार?

विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल www.mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in, www.mahresult.nic.in या वेबसाईटवरपाहता येईल.

ssc result
Pune PMC Recruitments: पुणे महापालिकेत ३२० जागांसाठी भरती! जून- जुलैमध्ये होणार परीक्षा; जाणून घ्या संपूर्ण माहिती..

कसा पाहाल निकाल?

>> सर्वात आधी www.mahresult.nic.in अधिकृत वेबसाइटवर जा.

>> दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

>> तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.

>> दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com